एक्स्प्लोर

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची सत्ता असलेला 'गोडसाखर'ही ईडीच्या रडारवर? हरळीमधील जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी

Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे वर्षाच्या सुरुवातीपासून लागलेला ईडीचा ससेमीरा कायम आहे.

Hasan Mushrif : माजी कामगार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे वर्षाच्या सुरुवातीपासून लागलेला ईडीचा ससेमीरा कायम आहे. 21 दिवसांपूर्वी झालेल्या ईडीच्या छापेमारीनंतर आज पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील जिल्हा बँकेची शाखा, तसेच  गडहिंग्लज तालुक्यातील हरळीमधील 'गोडसाखर'ला (अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना) लागून असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापेमारी केली आहे.

दरम्यान, या तीन ठिकाणच्या तपशील समोर आला असला, तरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांवर छापेमारी केल्याची चर्चा जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप करत वर्षाच्या सुरुवातीला ट्विट करताना त्यांना यावर्षी हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच ईडीने कोल्हापूरमध्ये छापेमारी केली. पुण्यामध्येही  छापेमारी केली होती. मात्र, 21 दिवसांपूर्वी झालेल्या छापेमारीचा कोणताही तपशील आतापर्यंत ईडीने सादर केलेला नाही. तोपर्यंत आता पुन्हा एकदा नव्याने छापेमारी केली आहे. 

अप्पासाहेब नलवडे कारखान्यावरून सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर गंभीर आरोप केले आहेत. या कंपनीशी निगडीत असलेल्या ब्रिक्स कंपनीच्या कार्यालयावरही 11 जानेवारी छापेमारी करण्यात आली होती. मात्र, कारखान्याकडे कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने गोडसाखरकडे मोर्चा वळवला आहे. हरळीमधील शाखेत ईडीचे पथक इतरांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आला होता.  

हसन मुश्रीफ यांनी सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. मागील कारवाईनंतर त्यांनी कट्टर राजकीय विरोधक समरजितसिंह घाटगे यांच्यावर आरोप केला होतात. त्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी आरोप फेटावून लावले होते. या गेल्या महिन्यात 11 जानेवारी रोजी झालेल्या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता, मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. छापेमारीमागे कोलकता कनेक्शन असल्याचे पण म्हटले जात आहे. बंद पडलेल्या कंपन्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून ते नंतर कारखान्यासाठी वळण्यात आल्याचा आरोप ईडीमधील सूत्रांनी केला आहे. दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
Satara Accident: साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
Tiger Shroff : दिल्लीतून मुंबईत आले, पिस्तूल देऊन गेले, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, दोन तरुणींचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर
Tiger Shroff : दिल्लीतून मुंबईत आले, पिस्तूल देऊन गेले, टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, दोन तरुणींचाही समावेश, धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget