एक्स्प्लोर

Kolhapur News: निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटलांना धक्का; काँग्रेसचा गटनेता शिंदे सेनेच्या गळाला

काँग्रेस आमदार तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे प्रमुख शिलेदार माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना घेण्याचा कार्यक्रम सुरुच आहे. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकण्यासाठी तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेल्या घोळानंतर तसेच उमेदवारी डावलल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता समोर आली होती. 

माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत

काँग्रेस आमदार तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे प्रमुख शिलेदार माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज (6 जून) ठाण्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. पुढील काही दिवसात शारंगधर देशमुख आणि त्यांच्या सोबतचे काँग्रेसचे काही नगरसेवक शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस गटनेता गळाला लागल्याने शिंदे गटाला फायदा होणार आहे. 

35 नगरसेवक शिंदेसेनेत येणार, राजेश क्षीरसागरांचा दावा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोलताना काँग्रेसचे दहा नव्हे, तर 35 नगरसेवक शिंदेसेनेत येणार असल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता. टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्रे डागून विरोधकांचे तळ उद्ध्वस्त केले जातील, असेही क्षीरसागर यांनी म्हटले होते. क्षीरसागर म्हणाले की, आम्ही महापालिका महायुती म्हणून लढणार आहोत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर नेता आमच्या पाठीशी असल्याने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर करून दाखवणार आहोत. त्यांनी म्हटले होते की, 35 माजी नगरसेवक शिवसेनेत येतील. काहीजणांचा प्रवेश जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल. माझ्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन महापालिका निवडणुका लढवल्या. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण अपेक्षित यश मिळाले नाही. आमचे 15 उमेदवार शंभरपेक्षा कमी मतांनी पडले. आमच्या 22 उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. प्रत्येक वेळी एकच गोष्ट कमी पडत होती, पण आता काही कमी पडणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूरला शिवसेनेचा पहिला महापौर मिळेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत

व्हिडीओ

Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
बीडमध्ये बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दणका, 400 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; 18 कर्मचारी निलंबित
Palash Muchhal: स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
स्मृती मानधनाने तत्काळ सोशल मीडियात नामशेष केल्यानंतर आता पलाश मुच्छलही त्याच वळणावर! अवघ्या काही तासात घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
रोहित विराटला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं? बीसीसीआयने अखेर मौन सोडलं!
Leopard attack Government job: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देणार? वन विभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड, मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली
"तो विनर होण्याच्या लायकीचा नाही" गौरव खन्ना विजेता ठरताच फरहाना भट्टची प्रतिक्रिया
Kadsiddheshwar Maharaj: कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांवर लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; गुन्हा दाखल होताच नेमकं काय म्हणाले?
Pune Navale bridge: नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
नवले पुलावरील ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात, स्कूल बसची कारला धडक, दोन जण जखमी
Embed widget