Kolhapur Crime News: बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून; कबनूरजवळ डोक्यात घातला दगड
Kolhapur Crime News: कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कबनूर इथ मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निघृण खून करण्यात आला.

Kolhapur Crime News कोल्हापूर: कोल्हापूरच्या इचलकरंजीतील (Kolhapur Crime News) कबनूर इथे मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निघृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर , विशाल राज लोंढे आणि आदित्य संजय पोवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक केली.
कोल्हापूरमधील आणखी एक धक्कादायक घटना, महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू- (Kolhapur News)
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुरुकली या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून घातपात होता असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रज्ञा कांबळे या तरुणीचा कॉलेज समोर असलेल्या बस स्टॉपजवळ अपघात झाला होता. मात्र हा घातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केला. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू झाला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या समोरच अडवला. अपघात करणाऱ्या संबंधित तरुणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्या कडून करण्यात आला.
























