Fancy number plate : कुठंबी हुडीक, शेम टू शेम नंबरची गाडी, आख्खं गाव फॅन्सी नंबरच्या गाड्यांचं!
Fancy number plate Kolhapur : इतं एक गाव असं बी हाय तिथं आडनावावरणं नाही तर गाड्यांच्या नंबरवरनं कुठल्या घरातली गाडी हाय हे वळाखत्यात
Fancy number plate Kolhapur : एकादा इचार मनात घुसला की तो केल्या बिगर मागं हाटायचं नाही ही कोल्हापूरकरांची (Fancy number plate Kolhapur) ओळख....मग काय बी असू दे...नाद खुळा गोष्ट करणार म्हणजे करणारच.... इतं एक गाव असं बी हाय तिथं आडनावावरणं नाही तर गाड्यांच्या नंबरवरनं कुठल्या घरातली गाडी हाय हे वळाखत्यात...म्हणजे जरा कमी सगळेच्या सगळे नंबर अगदी फॅन्सी हायत... सरकारनं नुकतंच नवीन अँप आणलंय... तवा या गावकऱ्यांना काय वाटतं बघूया....
कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रयाग चिखली गाव....गाव तसं मोठं हाय म्हणा अन् इथली माणसं बी मोठ्या दमाची....म्हणजे डोस्क्यात एखादी गोष्ट आली की ती करणार म्हणजे करणार....आता गावातल्या जरा गाड्या बघा.. जिकडं बघील तिकडे फॅन्सी नंबर.... कुणाचा 9898.. कुणाचा 2020...कुणाचा 3003 तर कुणाचा 3232... परतेकाच्या दारात हो म्हणून गाड्या हायती....आणि त्यांचं नंबर बी बघा कसं फॅन्सी हायती...आता ह्या पिसाळांच्या ढीगभर गाड्या हायती... सगळ्यांचं नंबर 9898 फकस्त...भागात कुणी बी गाडी न्हेली की पिसाळांची गाडी घेऊन आलाईस व्हय म्हणून बोलल्याशिवाय राहित नाहीत...
आता हे वरूटे काका बघा....वयस्कर झाले तरी फॅन्सी नंबरचा (Fancy number plate Kolhapur) नाद काय सुटत नाही....ह्यांच्या घरातली सगळी मंडळी 3003 नंबरच्या गाड्या वापरत्यात...एकदा नंबर लकी लागला म्हणून तोच नंबर घ्यायला सुरवात केली...आता ह्यांच्याकडं मोटारसायकली, ट्रॅक्टर, कार हायती पण सगळ्यांचा 3003 नंबरचं...
आता या सनी पाटलांच्या वडिलांनी यामाहा गाडी घेतली व्हती... त्याचा नंबर 2020 व्हता.. दारात ढीगभर गाड्या हाईत... पण सगळ्याचं नंबर 2020...
बरं आदी ह्या सगळ्यासनी ओळखीवर नंबर मिळत व्हतं...पण आरटीओनं नियम बदलला आणि यांची गोची झाली....गोची कुठली म्हणता राव... आधी नंबर घेतात आणि मग गाडी कुठली घ्यायची ते ठरवत्यात...फॅन्सी नंबर मिळालं तवाच पासिंग आणि गाडी बी घरात...पैसे भरुन का असेना पण गाडीला जो नंबर पाहिजे तो घेणारच...
असलं गावं कुठं पाहिलं व्हय वो तुम्ही...पाहिलं बी नसंल आणि गावणारबी नाही....कुठं बी घुमीव गावातली गाडी वळकतीयाच... पण आता सरकारने नवीन ॲप आणलय... तवा आरटीओकडं जायची गरज नाही...खटक्यावर बोट ठेव... भर पैसे आणि घे कुठलाही नंबर अशी व्यवस्था केलीय...
इतर महत्त्वाच्या बातम्या