एक्स्प्लोर

Eknath Shinde : दिसायला भोळा आणि भानगडी सोळा; कोल्हापूरचा कोणता नेता एकनाथ शिंदेंच्या रडारवर?

Kolhapur Shiv Sena : बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 100 वेळा विचार करा, पण दिलेला शब्द बदलू नका. बाळासाहेब यांचे विचार बदलले त्यांना धडा शिकवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

कोल्हापूर: मी कुणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर सोडत नाही. आम्ही काही लपून छपून करत नाही, खुलेआम करतो असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला. काही नेते दिसायला साधे असतात. दिसायला भोळा आणि भानगडी सोळा असे काही नेते कोल्हापुरात आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. आता हा टोला एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील कोणत्या नेत्याला उद्देशून लगावला याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.  

उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या आभार यात्रेमध्ये बोलत होते. या कार्यक्रमावेळी त्यांनी कोल्हापूरकरांचे आणि  राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर याचे कौतुक केले. मी मुद्दाम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना केलं. कारण या विभागात लोकांची सेवा करायची संधी मिळते. राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपला प्रकाश आरोग्याचं काम करतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कोल्हापूरकरांनी विरोधकांना थ्रो करून टाकलं

एकनाथ शिंदे म्हणाले की, "कोल्हापूर आणि शिवसेनेचे नातं वेगळे आहे. बाळासाहेब नेहमी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करायचे. पण बाळासाहेब यांच्या विचारांचा गळा घोटाणाऱ्याबद्दल काय बोलावं? कोल्हापूरकरांनी 'एक ही मारा लेकीन सॉलिड मारा'.  बाळासाहेब यांचे विचार बदलले त्यांना धडा शिकवण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलं. कोल्हापूरकरांनी यूज अॅण्ड थ्रो करणाऱ्यांना थ्रो करून टाकलं. कोल्हापूरच्या महापुरात मुंबईत बसून धंदे करत होते, त्यावेळी महापुरात हा एकनाथ शिंदे आला होता."

इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी

एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो तुमचे आभार मानतो. व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि समोर बसलेलं आमचं वैभव आहे. निवडणुकीत मी वचन दिलं होतं. म्हणून आभार मानायला आलो. अडीच वर्षात तुमचा एकनाथ शिंदे 22 तास काम करत पायाला भिंगरी बांधून फिरला. काम केलं निर्विवाद म्हणून जनतेनं दिलं भरभरून आशीर्वाद. आमचं ठरलं म्हणत कोल्हापूरच्या जनतेनं 10 पैकी 10 आमदार दिले. इथं खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी केलं, टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही प्रकाशला आमदार केलं, मी त्यांना नामदार केलं, पालकमंत्री केलं. कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही, जाळ आणि धूर संघटच निघतो."

सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आणणार

एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर दारात उभारून काम करणारा असतो. विरोधकांनी लोकसभेला फेक नेरेटिव्ह तयार करून थोडं यश मिळवलं. विधानसभेला हॉटेल बुक करू ठेवले होते. पण जनतेनं त्यांना दाखवून दिलं. ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना जनतेनं कोल्हापुरी जोडा दाखवला. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार? आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नसलो तरी जनतेच्या जीवनात सोन्याचा दिवस आणण्यासाठी जन्माला आलो. आम्ही लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन थांबणार नाही."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "श्री बाळूमामा मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडा होतोय. हे पुरोगामी राज्य आहे, विकासाचं राज्य आहे. या राज्याला आर्थिक बळ मिळत जाईल तसं राज्यातील योजना अंमलात आणू. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 100 वेळा विचार करा, पण दिलेला शब्द बदलू नका." 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget