Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापुरातील कणेरी मठावर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद पाहण्यास मिळाला. धुळे लोकसभेला सहापैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात 1 लाख 94 हजार मतांनी मागे जातो आणि चार हजार मतांनी हरतो. निवडणुकीत हार जीत महत्वाची नाही, कधी हा पक्ष जिंकेल, तर कधी तो पक्ष जिंकेल. मात्र, संघटित मतदान करून हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो, असा काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला असून 48 पैकी 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापुरातील कणेरी मठावर आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
आपली लढाई सत्याची आहे
ते पुढे म्हणाले की, हिंदू समाजातील मुलींना फसवून नासवलं जात आहे. एक लाखांपेक्षा जास्त घटना खोटं बोलून लग्न करून फसवणूक केल्याच्या आहेत, हा लव्ह जिहाद आहे. व्होट जिहाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदुत्व म्हणजे सहिष्णूता आहे, हिंदू समाजाला दिशा देणाऱ्यांनी आता समाजाला अजुन जाग करायला हवं. कितीतरी हजारो वर्षांपूर्वी आमची संस्कृती आहे. आज देशामध्ये सांस्कृतिक वारसा पुढे नेणार सरकार आहे. आपण जसं संघटित होतं आहोत तस आपले विरोधी लोक संघटित होत आहेत. आपली लढाई सत्याची आहे, ही आता जिंकावीच लागेल याला आता आपल्या सर्वांची ताकद हवी असल्याचे त्यांनी सांगितले. गोमाता आणि आपली संस्कृती पुढे नेणार सरकारच आता आपल्याला हवं असल्याचे त्यांनी सांगितले.
चोरून आम्हाला काशी विश्वनाथ दर्शन घ्यावं लागत होतं
फडणवीस म्हणाले की, संघटित ताकद काय आहे हे पहा. आपल्यावर आघात होत आहे हे समजल्यावर दाखवायला हवं. चोरून आम्हाला काशी विश्वनाथ दर्शन घ्यावं लागत होतं, तिथं आम्ही ताठ मानेने जात आहोत. आमची एकसंध संस्कृती आहे. आमच्या साधू संतांनी संपूर्ण देशामध्ये जी संस्कृती रुजवली ती टिकली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, जगामधील अनेक देशाना माहिती आहे हा देश वेगाने पुढे जात आहे. या देशाला रोखण्याचं काम बाहेरचे इतर लोक करत आहेत. ज्या संघटना नास्तिक तयार करतात, ज्या संघटना आमच्याबद्दल चुकीचा संदेश तयार करतात त्यांना दाखवायला हवं, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या