CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; असा आहे नियोजित कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (11 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचे उद्या दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.
CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (11 फेब्रुवारी) कोल्हापूर (Kolhapur News) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचे उद्या दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते मोटारीने कणेरी मठाकडे प्रयाण करतील. कणेरी मठावर आगमन झाल्यानंतर ते दुपारी अडीचपर्यंत असतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 2.45 वाजता विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
जानेवारी महिन्यात दौरा अचानक रद्द
दरम्यान, मागील महिन्यात 6 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा प्रस्तावित होता. मात्र, दौरा अचानक रद्द झाला होता. मुंबईमध्ये अचानक महत्त्वाचं काम आल्याने दौरा रद्द करण्यात आला होता. कोल्हापूर दौऱ्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करणार होते. त्यानंतर त्यांच्या मुळगावी प्रस्थान करणार होते.
कणेरी मठावर सुमंगल पंचमहाभूत महोत्सव
दरम्यान, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळ्यात 30 लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. या महोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेण्याची शक्यता आहे.
महोत्सवाचा प्रारंभ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिनी होणार आहे. या दिनानिमित्त कोल्हापूर शहरातून शोभायात्रा काढण्यात येईल. पर्यावरणासंबंधी चित्ररथ हे या मिरवणुकीचे आकर्षण असेल. या महोत्सवात पंचमहाभूततत्त्वावर पाच स्वतंत्र दालने प्रमुख आकर्षणे ठरतील. आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी या पाच तत्त्वांवर आधारित या दालनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे. आरोग्य आणि संस्कार यासंबंधी स्वतंत्र दालने असतील. एकाचवेळी 10 हजार नागरिक कार्यक्रम पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. याशिवाय शेती अवजारे, बी- बियाणे आणि महिला बचत गटांचे मिळून एक हजारहून अधिक स्टॉल असतील.
दुसरीकडे, या महोत्सवात सर्व शासकीय विभागांच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन स्टॉल लावावेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा पंचमहाभूत महोत्सवाचे नोडल अधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या