Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : "महाराजांना दुसरा पावणा चालला नसता, सर्वांना चितपट करणाऱ्या शरद पवारांच्या हस्ते शाहू महाराजांचा सत्कार झाल्याचा आनंद"
सामाजिक,राजकीय, साहित्यिक,क्रीडा क्षेत्रात सर्व काही चितपट केलं अशा शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराजांचा सत्कार होतोय याचा आनंद असल्याची प्रांजळ कबूली संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : सामाजिक,राजकीय, साहित्यिक,क्रीडा क्षेत्रात सर्व काही चितपट केलं अशा शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराजांचा सत्कार होतोय याचा आनंद असल्याची प्रांजळ कबूली संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. शाहू महाराज यांचा अमृतमहोत्सवी 75व्या वाढदिवसानिमित्त आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रातील मांदियाळी उपस्थित होती.
सत्कार समारंभ पार पडल्यानंतर संभाजीराजे यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी शरद पवार कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानताना दिलखुलास दाद देत प्रांजळ कबूली दिली. संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी जपला ते छत्रपती शाहू महाराज आहेत. शाहू महाराज हे उत्कृष्ट पैलवान होते. माझ्या लग्नापर्यंत अडीचशे ते तीनशे जोर मारायचे. 800 ते 1000 बैठका बैठका रोज मारत होते. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी सामाजिक,राजकीय, साहित्यिक,क्रीडा क्षेत्रात सर्व काही चितपट केलं अशा शरद पवार यांच्या हस्ते शाहू महाराजांचा सत्कार होतोय (Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday) याचा आनंद आहे. आणि महाराजांना दुसरा पावणा चालला नसता हे सुद्धा प्राजंळपणे सांगतो.
कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय
दरम्यान, शाहू महाराज यांनी कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापुरात कुस्ती मागे पडत (Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday) असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापूर कुस्तीपंढरी आहे, पण आपण मागे पडलोय पूर्वीचे स्थान मिळालं पाहिजे. दोन तीन वर्षांनी मैदान भरलं हे पाहून आनंद झाला. राष्ट्रीय तालीम संघाने केलेल्या प्रयत्नांनी मैदान भरलं आहे. आयुष्यातील 75 वर्षे आली कधी आणि गेली कधी हे कोल्हापुरात राहून कळालंच नाही. मंडळींना नंतर लक्षात आलं की माझा 75 वा वाढदिवस साजरा केला पाहिजे. मला आवश्यकता नव्हती, पण घरच्या मंडळींना वाटलं म्हणून ठरवला.
शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली
नागरी सत्कारानंतर शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना म्हणाले की, सत्ता हाती आल्यानंतर सामान्यांसाठी वापरायची असते, याचा आदर्श शिवछत्रपतींनी केला. अनेक राजवाडे होऊन गेले, पण त्यांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती, पण एकच राज्य असं होतं जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज्य होतं. हा इतिहास छत्रपतींच्या घराण्यांनी जतन केला आहे.
समतेची विचारधारा कृतीमध्ये आणण्यासाठी राजा कोणता याची चर्चा देशात होते तेव्हा पहिल्यांदा नाव छत्रपती शाहू महाराजांचे (Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday) येते. ही शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली याचा आनंद आहे. छत्रपती असूनही त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी आहे. महाराष्ट्रात अनेक संकटे आली, महापूर आला, कोरोनाचे संकट आले तेव्हा छत्रपती वाड्यात राहिले नाहीत, ते सामान्य माणसांचे दु:ख कमी करण्यासाठी रस्त्यावर आले. त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात आस्था आहे. खेळाच्या क्षेत्रात आस्था आहे. अनेक शैक्षणिक संस्था उत्तमरित्या चालवण्यासाठी शाहू राजांनी भूमिका घेतली
इतर महत्वाच्या बातम्या