एक्स्प्लोर

Kolhapur News : बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट; कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा अपघाती मृ्त्यू, हेल्मेटचे सुद्धा तुकडे

बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सीपीआरमध्ये मोठी गर्दी झाली होती. सिद्धार्थ हा एकुलता एक होता.

कोल्हापूर : आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये कोल्हापुरातील (Kolhapur News) उद्योजकाचा मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तब्बल 12 लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावरती 70 हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असताना सुद्धा जीव गमवावा लागला. सिद्धेश विलास रेडेकर (वय 23, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. सिद्धार्थ बायकर्स होता. बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सीपीआरमध्ये मोठी गर्दी झाली होती. सिद्धार्थ हा एकुलता एक होता. मात्र, वेगाच्या नशेनं जीवाला मुकला आहे. 

धोकादायक वळणावर तवेराला समोरून भीषण धडक

सिद्धार्थ बायकर्स असल्याने नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती. तसेच त्याला फोटोग्राफीची सुद्धा आवड होती. नेहमीप्रमाणे सिद्धार्थ रेडेकर हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्र सुद्धा सोबत होते. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते. आंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत व फोटोसेशनही केलं होतं. त्यानंतर सकाळी 11 वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली. 

70 हजाराच्या हेल्मेटचे तुकडे झाले

त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले, इतकी ही भीषण धडक होती. या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. अत्याधुनिक हेल्मेट डोक्यावर असताना सुद्धा असताना त्याचे तुकडे झाले होते. या हेल्मेटला कॅमेरा सुद्धा होता. त्यामुळे आता कॅमेरामधून काही माहिती समोर येते का याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आपल्या गाडीचा वेगच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. या अपघातामध्ये बारा लाखांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. हेल्मेट सुद्धा फुटलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
India Q2 GDP : भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
भारताचा दुसऱ्या तिमाहीचा GDP दर RBI चा अंदाज मागं टाकत 8.2 टक्क्यांवर, केंद्राकडून आकडेवारी जाहीर
Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा लिलाव आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
सोने आणि चांदीच्या दरातील तेजी सुरुच, जीएसटीसह सोनं 1 लाख 30 हजारांवर, जाणून घ्या चांदीचे दर...
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
Embed widget