एक्स्प्लोर

Kolhapur Accident News: पाठीला स्कूल बॅग जशीच्या तशी, अंगात रेनकोट, कोल्हापुरात वाहून गेलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला!

Kolhapur Accident News: कोल्हापुरात ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 11 वर्षाचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता, त्याचा मृतदेह सापडला आहे.

Kolhapur Accident News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पावसाने (Heavy Rain) अक्षरश: झोडपलं आहे. काल (गुरुवारी, ता,12) सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली. काही वेळातच पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं. काल झालेल्या या पावसामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. कोल्हापूर शहराजवळ सरनोबतवाडी येथे शाळकरी मुलगा घरी जात असताना ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने, पाण्याला प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं बचाव पथ कालपासून या शाळकरी मुलाचा शोध घेत आहेत. या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास ओढा ओलांडत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने शाळकरी मुलगा वाहून गेला होता. अमन भालदार असं या शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने शोध मोहीम राबवत या विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला आहे.  सरनोबतवाडी मणेर मळा येथील ओढ्यामध्ये हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

15 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात जोरदार पुनरागमन 

तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी कोल्हापुरात जोरदार पुनरागमन केलं. सकाळी हलक्या सरीनंतर वातावरणात उष्णता जाणवत असतानाच, सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह तुफान पावसाने कोल्हापुरात हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच कोल्हापुरासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सुमारे एक तास पडलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं. राजारामपुरी, दुधाळी परिसर, सरनाईक वसाहत, परीख पूल, पाचगाव यांसारख्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. परिणामी, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

एका तरूणाला वाचवण्यात यश

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव परिसरात ओढ्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहतूक मंदावली. याच ठिकाणी ओढ्याचं पाणी पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. स्थानिकांनी दोऱ्याच्या साहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा प्रयत्न अपयशी ठरला, मात्र तरुणाने प्रसंगावधान राखत पुढे गेलेल्या झाडाला पकडलं. स्थानिकांनी पुढे धाव घेत त्याचा यशस्वी रेस्क्यू केला.

जनजीवन विस्कळीत

या मुसळधार पावसामुळे शाळा व कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सखल भागात गुडघाभर पाणी साचलं असून, घरात व आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. शहरात वाहतूक खोळंबली असून, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावं, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Tata चा शेअर बनला रॉकेट, रेखा झुनझुनवालांची संपत्ती तब्बल 800 कोटींनी वाढली, बाजारात मोठी घडामोड  
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Video: मोठी बातमी! इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election: काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद; चंद्र आणि सूर्य सोडून सर्वच आश्वासन सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांना दिली; खासदार धनंजय महाडिकांची टीका
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
पोलिसांनी विवस्त्र करुन मारहाण केली, भाजप महिला कार्यकर्तीचा आरोप; व्हिडिओवर आयुक्तांकडून स्पष्टीकरण
Embed widget