Kolhapur News : बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; खंदा समर्थक हरपल्याने मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
गणपतराव फराकटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच हसन मुश्रीफ रुग्णालयात पोहोचले. यावेळी सांत्वन करताना मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले. मुश्रीफ यांना मताधिक्य देण्यात फराकटे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) आकस्मिक निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील तर कागल पंचायत समितीच्या माजी सदस्या, माजी सरपंच शोभाताई फराकटे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
तात्या भावपूर्ण श्रद्धांजली ...!#rip pic.twitter.com/zuPdFlzL9C
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) August 25, 2024
हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर
गणपतराव फराकटे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांची कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. फराकटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच हसन मुश्रीफ रुग्णालयात पोहोचले. यावेळी सांत्वन करताना मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले. हसन मुश्रीफ यांना मताधिक्य देण्यात नेहमीच गणपतराव फराकटे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
माझे जिवाभावाचे सहकारी व नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बिद्री बोरवडे विभागातील खंदे समर्थक कै.श्री. गणपतराव फराकटे (तात्या) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..... pic.twitter.com/Pd8DKjI4ZF
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) August 24, 2024
बिद्री साखर कारखान्याचे 2005 पासून संचालक
गणपतराव फराकटे बिद्री साखर कारखान्याचे 2005 पासून संचालक होते. निवडून आल्यानंतर त्यांनी बिद्रीचे उपाध्यक्षपद सांभाळले. गेल्यावर्षी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली. बोरवडेचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणूनही 2017 मध्ये निवडून आले होते.
भावपूर्ण श्रद्धांजली!
— Raje Samarjeetsinh Ghatge (@ghatge_raje) August 24, 2024
बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन गणपतराव फराकटे यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...#भावपूर्ण #श्रद्धांजली pic.twitter.com/AV3mT1DPJx
इतर महत्वाच्या बातम्या