Kolhapur Crime : नात्यातील अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन नराधमाकडून अत्याचार; पीडिताला दिवस गेल्याने प्रकरण उजेडात
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात अल्पवयीन जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणारा नराधम हा नात्यातील असून अल्पवयीन सुद्धा आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात अल्पवयीन जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणारा नराधम हा नात्यातील असून अल्पवयीन सुद्धा आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी संशयित नराधमाला बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पीडिताला गर्भवती राहिल्याने प्रकरणाला वाचा फुटली. शुक्रवारी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. (kohalpur crime)
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शाहूवाडी तालुक्यात घडला. याबाबतची तक्रार पीडिताच्या आईने पोलिसांत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित नराधमाने अल्पवयीन मुलीच्या राहत्या घरी मे 2022 ते जुलै 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच कोणाला बोलल्यास ठार करण्याची धमकी दिल्याने पीडित मुलगी घाबरून गेली होती. मात्र, संबंधित पीडितेला दिवस गेल्याने प्रकरणाला वाचा फुटली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर संशयित नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अश्लील हावभाव करून तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न
महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराची प्रवाशांनी चांगली धुलाई केल्याची घटना इचलकरंजी बस स्थानकामध्ये सोमवारी घडली होती. अश्लील हावभाव करून तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला इचलकरंजी बसस्थानकात चांगलाच चोप दिला. पीडित तरुणीच्या भावाने आणि बसस्थानकातील प्रवाशांनी टवाळखोराची धुलाई करत वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची पोलिसांकडे नोंद झाली नसली, तरी चोप दिल्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली.
संबंधित मुलगी नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुटल्यानंतर मैत्रिणींसह घरी जाण्यासाठी मुख्य बसस्थानकात पोहोचली. यावेळी गावी जाणाऱ्या बसच्या प्रतीक्षेत होती. बसची वाट पाहत असतानाच पीडित तरुणीकडे पाहून एक टवाळखोर हावभाव करत होता. ही बाब मुलींच्या निदर्शनास आली. तो वारंवार त्रास देऊ लागल्याने पीडित मुलीने बसस्थानकात भावाला बोलवून घेतले. भावाने बसस्थानकात पोहोचून विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तोपर्यंत हा सर्व प्रकार बसस्थानकातील अन्य प्रवाशांपर्यंत पोहोचला. प्रवाशांनी टवाळखोराला चांगलीच अद्दल घडवत सुमारे 10 मिनिटे धुलाई केली. त्यानंतर त्याला वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले.
इतर महत्वाच्या बातम्या