एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने मोठा दिलासा; जिल्ह्यातील 15 बंधाऱ्यांवरील पाणी ओसरले

Kolhapur Rain Update: राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. एकाच दिवशी काही तासांमध्येच राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग सुरु होता.

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. एकाच दिवशी काही तासांमध्येच राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग सुरु होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आणखी धास्ती वाढली होती. मात्र, प्रत्यक्षात पावसाची उघडीप असल्याने संकट मागे टळले आहे.  

केवळ पॉवर हाऊसमधून 1400 क्यूसेक्स विसर्ग सुरु

राधानगरी धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बंद झाला. यानंतर रात्री आठ वाजता चार आणि सात नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये 5 आणि 6 नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीपात्रातील विसर्ग बंद झाला आहे. सध्या केवळ पॉवर हाऊसमधून 1400 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 15 बंधाऱ्यांवरील पाणी ओसरले

गेल्या आठवडाभरापासून पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळीवरून वाहत आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने 15 बंधाऱ्यांवरील पाणी उतरले आहे. त्यामुळेही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अजूनही 67 बंधारे पाण्याखाली आहेत. 

पंचगंगा नदी 41 फुट 4 इंचांवर

दरम्यान, कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर (Kolhapur Rain Update) पंचगंगा पाणी पातळी आज (28 जुलै) रोजी रात्री 9 वाजता 41 फुट 4 इंचांवर पोहोचली आहे. पावसाची उघडीप आणि राधानगरी विसर्ग बंद झाल्याने पूर ओसरण्यास मदत होणार आहे. 

कोल्हापूर शहरात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उघडीप महापुराचे संकट टळले आहे. राधानगरी धरणातून होत असलेला विसर्ग तसेच पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने आणखी पावसाचा जोर वाढला असता, तर महापुराची टांगती तलवार अटळ होती. मात्र, हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊनही उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंचगंगेची पाणीपातळी 50 फुटांवर जाईल, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनीही सुद्धा पाणी पातळी सात ते आठ फूट वाढेल, असे सांगितल्यानंतर तातडीने स्थलांतर सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात इंचाइंचाने वाढ होत असल्याने दिलासा मिळाला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget