Ambabai Mandir : अंबाबाई मंदिर 21 तारखेला दर्शनासाठी बंद राहणार, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिखरांची रंगरंगोटी
Ambabai Mandir : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात स्वच्छता सुरू आहे. मंदिराच्या गाभार्याची व दागिन्यांची स्वच्छता बुधवारी (दि. 21) करण्यात येणार आहे. यामुळे त्या दिवशी दर्शन बंद राहणार आहे.
Ambabai Mandir : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात स्वच्छता सुरू आहे. मंदिराच्या गाभार्याची व दागिन्यांची स्वच्छता बुधवारी (दि. 21) करण्यात येणार आहे. यामुळे त्या दिवशी अंबाबाईचे दर्शन बंद राहणार आहे. मात्र, भाविकांसाठी देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आजपासून रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील तयारी जय्यत सुरु आहे. अंतर्गत मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असून बुधवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येईल. गाभाऱ्यातील स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा मूर्तीला अभिषेक करून सालंकृत पूजा बांधण्यात येईल.
सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छता
बुधवारीच अंबाबाईच्या हिरेजडित व सोन्याच्या अलंकारांचीही स्वच्छता केली जाणार आहे. देवीचे नित्य व नैमित्तीक वापरातील दागिने वेगवेगळे असतात. तसेच उत्सवमूर्तीचे अलंकारही वेगळे आहेत. या अलंकारांची वर्षातून एकदा स्वच्छता केली जाते.
भाविकांना सुविधा देण्यावर भर
दरम्यान, कोरोनामुळे गेल्यावर्षी दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. मात्र, यंदा गाभार्यामध्ये दर्शनाला जाणार्या भाविकांना दर्शन रांगेतून जावे लागणार आहे. शिवाजी चौकापासून दर्शन रांगेसाठी मंडप उभारला जाणार आहे. मुखदर्शनासाठी भाविकांना महाद्वारसह सर्व दरवाजांतून प्रवेश दिला जाईल. त्यासाठी गरुड मंडपाशेजारी रांग लावण्यात येणार आहे. दर्शनानंतर सर्व दरवाजांतून बाहेर पडता येईल.
तसेच भाविकांसाठी दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच देवस्थानचे कर्मचारी दर्शन रांगेत पिण्याचे पाणी देणार आहेत. शिवाजी चौक, जुना राजवाडा, बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, ताराबाई रोड, महाद्वार रोड या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या