एक्स्प्लोर

Kini Toll Plaza : किणी टोल नाक्यावर मुदत संपूनही टोलवसुली सुरुच, मनसेकडून जोरदार आंदोलन

Kini Toll Plaza : किणी टोल नाक्याववर आज मनसेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेताना किनी टोल नाक्यावरील वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी केली

Kini Toll Plaza : किणी टोल नाक्यावर आज मनसेकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेता किणी टोल नाक्यावरील वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मनसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना मनसेच्या राज्यभरातील आंदोलनामुळे 65 टोलनाके बंद झाल्याचे म्हटले होते. या मुद्द्याला कोणत्या राजकीय पक्षाने हात घातला नाही, मात्र मनसेनं यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले होते.

दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किणी टोल नाक्यावर त्याचे पडसाद उमटले. गेल्या काही दिवसांपासून हा टोल नाका चर्चेत असून मुदत संपूनही वसुली सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी याच किणी टोल नाक्यावर मनसेकडून या संदर्भात आंदोलन करण्यात आले होते. आज पुन्हा आंदोलन करण्यात आले. टोल नाक्यावरील वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मारल्यानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांनी  आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी काही आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली. किणी टोल नाक्यावरील टोल वसूली मुदत संपली असली, तरी भूसंपादनाचा निधी वसूल झाला नसल्याचा दावा टोल नाक्यावरील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राज्यातील अनेक टोल नाक्यांवर मुदत संपूनही वसूली सुरुच असल्याने मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget