एक्स्प्लोर

Kolhapur News: गर्भपाताची माहिती न देणाऱ्या पती- पत्नीवर कारवाई होणार; जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे निर्देश

सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची खात्री करा, नसणाऱ्या केंद्रांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.

Kolhapur News: एक किंवा दोन मुली असणाऱ्या गरोदर मातेचा 12 आठवड्यानंतर गर्भपात झाल्याचे निदर्शनास आल्यास, अशा महिलांच्या गर्भपाताबाबतची योग्य ती माहिती आरोग्य विभागाने घ्यावी, या महिलेचा गर्भपात कोठे व कशामुळे झाला, याची खरी माहिती न देणाऱ्या पती- पत्नी आणि संबंधित कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय दक्षता पथक समिती (पीसीपीएनडीटी) ची जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठक वेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना केल्या. 

सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रांमध्ये तात्काळ सीसीटीव्ही बसवा 

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करा. कोणत्याही केंद्रामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करुन घ्या. सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची खात्री करा. सीसीटीव्ही नसणाऱ्या केंद्रांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही करा. गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील नोंदणी वेळेत होत असल्याची खात्री करा. 

या सर्व नोंदीची माहिती खासगी सोनोग्राफी केंद्रधारकांनी आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी घेवून शैक्षणिक अर्हता नसणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध तात्काळ कारवाई करा. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार गौरी पाटील तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

कोल्हापुरात  गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

दरम्यान, पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी जानेवारी 2023 मध्ये उघडकीस आणले होते. राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात या संदर्भातील गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गुन्ह्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राधानगरीत दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण 20 संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी 17 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. 

त्यातील डॉ. प्रसाद ढेंगे याने अनेक मृत भ्रूण वेदगंगा नदीत फेकून त्यांची विल्हेवाट लावली आहे. गर्भपातानंतर तो मृत भ्रूण प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवत होता. त्यानंतर गावाकडे जाताना नदीत फेकून देत होता. तीन भ्रूण नदीत फेकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्याने किती भ्रूण नदीत फेकले, याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Under 19 Asia Cup Women Team India  : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषकRajasthan Girl Bowling| झहीरसारखी गोलंदाजी करणाऱ्या सुशीलाचं सचिनकडून कौतुक Special ReportPopcorn GST | सिनेमागृहात पॉपकॉर्नच्या चवीनुसार तीन वेगवेगळे GST Special ReportPawan Chakki Special Report : पवनचक्कीचं 'रक्तरंजित' अर्थकारण,  पवनचक्की उद्योगाचं वारं का दूषित?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget