Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वकिल झाले न्यायाधीश; महिला वकिलांचे लक्षणीय यश
Kolhapur News: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 2021 मध्ये झालेल्या या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील लक्षणीय वकिलांनी कामगिरी केली.
Kolhapur News: दिवाणी न्यायाधीश (Civil Judge) कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. 2021 मध्ये झालेल्या या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) लक्षणीय वकिलांनी कामगिरी केली. जिल्ह्यातील 6 वकील न्यायाधीश झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकूण 60 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ॲड. अमृता जाधव, ॲड. स्नेहा साकळे, ॲड. तृप्ती इंगवले-नाईक, ॲड. करण जाधव आणि ॲड. प्रगती पाटील हे न्यायाधीश झाले आहेत. जिल्ह्यातून महिला वकिलांनी मिळवलेलं यश लक्षणीय आहे. ॲड. अमृता जाधव या पहिल्याच प्रयत्नात वकील झाल्या आहेत. कागल येथील ॲड. करण जाधवसुद्धा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आहेत.
वयाच्या पंचविशीतील ॲड. अमृता जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीची परीक्षा पास झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यात त्या प्रथम क्रमांकाने, तर राज्याच्या यादीत 14 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. त्या सध्या एलएलएमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहेत. शहाजी लॉ कॉलेजमधून पदवीधर झाल्या आहेत. ॲड. स्नेहा साकळे यासुद्धा न्यायाधीश झाल्या आहेत. कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमधून 2015 मध्ये कायद्याची पदवी घेतली. 2017 मध्ये त्यांनी पुण्यातील श्री नवलमल फिरोदीया लॉ कॉलेजमधून एलएलएम पूर्ण केले.
कसबा बावडा येथील ॲड. तृप्ती इंगवले-नाईक यांनी शहाजी लॉ कॉलेजमधून 2008 मध्ये कायद्याची पदवी घेतली. 2010 मध्ये शिवाजी विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केल्यानंतर नेट परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या घराण्यात वकिली कोणतीही पार्श्वभूमी नाही. लग्नानंतर बॅंकेची नोकरी सोडून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेची तयारी केली. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.
ॲड. प्रगती पाटील यासुद्धा न्यायाधीश झाल्या आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण राधानगरी तालुक्यातील चंद्रेत झाले. माध्यमिक शिक्षण नामदेवराव भोईटे विद्यालयात झाले. शहाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी 2015 मध्ये कायद्याची पदवी घेतली. तर 2017 मध्ये शिवाजी विद्यापीठातून एलएलएम विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. कागल येथील ॲड. करण जाधव पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे शालेय शिक्षण श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलमध्ये तर शहाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
महत्वाच्या इतर बातम्या :