एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kolhapur Loksabha : 17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!

Kolhapur Loksabha : या मेळाव्यात कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून कोल्हापूरचे पुरोगामित्व वाचवण्यासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातील 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. न्यू पॅलेसमध्ये झालेल्या मेळाव्यात या सर्व माजी नगरसेवक,महापौर यांनी उपस्थिती राहून शाहू महाराज यांचा प्रचार करण्याचा निर्धार केला. 

दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या वतीने माजी नगरसेवकांचा मेळावा घेऊन 105 नगरसेवकांनी पाठिंबा दिला असताना आज शाहू महाराज छत्रपती यांना इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या मेळाव्यात कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून कोल्हापूरचे पुरोगामित्व वाचवण्यासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी

आमदार सतेज पाटील यांनी नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यानंतर सांगितले की, कोल्हापुरात 18 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावामध्ये जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे. तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही बोलला नाही, तर मीही बोलणार नसल्याचे ते म्हणाले. राजकीय लढाईत टीकेला उत्तर आमच्याकडून निश्चित मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचा प्रवाह कोणाच्या बाजूने आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही ते म्हणाले. 

तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं?

संजय मंडलिक यांनी केलेल्या टीकेवरून ते म्हणाले की, कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडे कोल्हापूरची जनताच शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती. पायाखालची वाळू कोणाच्या सरकाय लागली हे आता लक्षात आलं आहे. जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात वारंवार यावं लागत आहे. दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं? अशी विचारणा त्यांनी केली. 

सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार, माढा लोकसभेत तुतारी वाजणार 

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. लोकं त्यांना मतदान करणार नाहीत, निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री मतदान मिळणार नाही, अशी खात्री असल्याची टीका त्यांनी केली. सतेज  पाटील यांनी सोलापूर आणि माढावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मतावर भाष्य केले. ते म्हणाले की, माझ्या मते सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार, माढा लोकसभेत तुतारी वाजणार आहे. महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. वेगवेगळे सर्व्हे येत आहेत. मात्र, काही माध्यमांची आकडेवारी पाहिली तर 586 जागांच्या आसपास येत आहे. लोकसभेचे खासदार 543 आहेत असणं अपेक्षित असल्याची टीका त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget