एक्स्प्लोर

शेतीतला रँचो, खोडव्याला खत देणारं भन्नाट यंत्र

कोल्हापूर: सध्या जिथं लावणीचा ऊस तुटलाय, तिथं खोडवा ऊस लागवडीची तयारी सुरु आहे.  खोडवा ऊसाला खताचा वेळेवर हप्ता दिला तर लावणीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळतं, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र हे खत देण्यासाठी शेतकऱ्यांनाही बरीच मेहनत करावी लागते. मजुरांची समस्या भेडसावते. ही मेहनत वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या एका शेतकऱ्यानं एक यंत्र तयार केलं आहे. दातेरी चाकं असणारं हे नवं यंत्र नाही तर पॉवर ट्रेलरच आहे. कोल्हापुरातील मिलिंद पाटील या तरुण शेतकऱ्यानं हे तयार केलं आहे. खोडवा ऊसाला खतं द्यायचं कामं हे यंत्र अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात करतं. खोडवा ऊसापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याला वेळेवर खतं देणं गरजेचं असतं. पारंपरिक पद्धतीत पहारीच्या मदतीनं ऊसाच्या बुडख्याजवळ खड्डा करुन खतं दिली जातात. यामध्ये वेळ आणि पैसा जातो. शिवाय ग्रामिण भागात मजुरांची समस्या ठरलेलीच. यावर मात करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रीच्या मिलिंद पाटील या एक नामी शक्कल लढवली आणि पॉवर ट्रेलरलाच ही दातेरी चाकं जोडली. या एका चाकाच वजन ३५ किलो असून यावर बसविलेल्या पहार पद्धतीच्या कोनाची उंची ४ इंच आणि रुंदी २ इंच आहे.एका चाकावर आठ पहारीच्या  आकाराचे कोन असून एक चाकाचा फेरा पूर्ण झाल्यानंतर जमिनीत आठ नाळे किंवा होल पडतात. आणि ऊसाला सहजरित्या खत देता येतं. खोडवा ऊसाला खत देण्यासाठी मिलिंद यांच्या पत्नीला मजूर शोधण्यासाठी मोठा त्रास व्हायचा. मजूर मिळाले तरी पाहिजे तसं काम होईलच असं नाही..मजुरीची खर्चही भरमसाठ होता..मात्र या यंत्राच्या निर्मितीनंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. हे यंत्र बनवण्यासाठी मिलिंद यांना 5 हजार रुपये खर्च आला आहे. अवघ्या 2 तासात या यंत्राद्वारे एका एकरावरील खोडवा ऊसाला खत देता येतं.  यासाठी फक्त 2 लिटर डिझेल लागतं, म्हणजेच एकरी फक्त 120 रुपये खर्च. पावणेचार फुटांच्या सरीतील खोडवा ऊसाला खत देण्यासाठी हे यंत्र बनवलं गेलंय. मात्र शेतकरी त्यांच्या गरजेनुसार या यंत्रात बदलही करु शकतात. कष्ट, पैसा आणि वेळ हे यांत्रिकीकरणामुळं वाचतात. हेच यांत्रिकीकरण मिलिंद यांनी अंगिकारलं. आणि घराच्याच वस्तूपासून यंत्राची निर्मिती केली. हे यंत्र आता पंचक्रोशीतील शेतकऱ्यात फेमस होतंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?
संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Embed widget