Khazana Gazal Mahotsav : 'खजाना' गझल महोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना दिली जाणार श्रद्धांजली
Khazana Gazal Mahotsav : 'खजाना' या गझल महोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
Khazana Gazal Mahotsav : 'खजाना' हा गझल महोत्सव (Khazana Gazal Mahotsav) गेल्या 21 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षीदेखील हा गझल महोत्सव होणार आहे. या महोत्सवात गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. त्यामुळेच 29 आणि 30 जुलैला पार पडणाऱ्या 'खजाना' गझल महोत्सवात लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
View this post on Instagram
पंकज उधास, अनूप जलोटा, रेखा भारद्वाज, तलत अजीज, विशाल भारद्वाज, हरिहरण या गायकांच्या उपस्थित लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. लता मंगेशकरांसह राजकुमार रिजवी आणि भूपिंदर सिंह यांनादेखील श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
'खजाना' या गझल महोत्सावाची सुरुवात 21 वर्षांपूर्वी पंकज उधास, तलत अजीज आणि अनूप जलोटा यांनी केली. या महोत्सवात सहभागी होणारे गायक कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. 'खजाना' गझल महोत्सवाची रसिकांना उत्सुकता असते. आता या महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या