(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grammy 2022 : आधी ‘ऑस्कर’, आता ‘ग्रॅमी’लाही लता मंगेशकरांचा पडला विसर, संतप्त चाहते म्हणतात...
Lata Mangeshkar : दिवंगत भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहण्यात ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 (Grammy Awards 2022) अयशस्वी ठरला आहे.
Lata Mangeshkar : दिवंगत भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहण्यात ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 (Grammy Awards 2022) अयशस्वी ठरला आहे. अवॉर्ड शोच्या ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये लतादीदींचा उल्लेखच नव्हता. गेल्या महिन्यात 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्येही लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांचा उल्लेख करण्यात आला नव्हता आणि आता ग्रॅमीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे.
सिंथिया एरिव्हो, लेस्ली ओडोम जूनियर, बेन प्लॅट आणि रॅचेल झेग्लर यांच्या नेतृत्वाखालील 2022 ग्रॅमीज इन मेमोरिअममध्ये दिवंगत ब्रॉडवे संगीतकार स्टीफन सोंधेम, टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला निधन झालेल्या संगीतकार लता मंगेशकर आणि बप्पी लाहिरी यांचा मात्र या विभागात उल्लेखही करण्यात आलेला नाही.
या प्रकारानंतर आता लता मंगेशकर यांचे चाहते सोशल मीडियावर ग्रॅमीच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी ‘द रेकॉर्डिंग अकादमी’ हे विसरल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे जाणून बुजून केलेले कृत्य असल्याचे म्हटले आहे.
‘भारताच्या गानकोकिळा’ लता मंगेशकर यांचे या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. 28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी 1942मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी 36 हून अधिक प्रादेशिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली. त्यांना 2001मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले आणि इतर अनेक सन्मानांसह तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील त्यांना मिळाले होते.
हेही वाचा :
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha