एक्स्प्लोर

Karuna Sharma On Walmik Karad: संतोष देशमुखांच्या तोंडामध्ये बाथरुम...; करुणा शर्मांचा धक्कादायक आरोप, म्हणाल्या, वाल्मिक कराड...

Karuna Sharma On Walmik Karad: एबीपी माझाशी संवाद साधताना करुण शर्मा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

Karuna Sharma On Walmik Karad: वाल्मिक कराड (Walmik Karad) यानेच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या केली, हा आरोप नाही, सत्यता आहे. वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांची हत्या केली. तसेच संतोष देशमुखांनी ज्यावेळी पाणी मागितलं, तेव्हा या गुंड्यांनी त्यांच्या तोंडामध्ये बाथरुम केली, असं खळबळजनक विधान करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) बोलल्या होत्या, वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांच्या पोटाचे पाणी हलत नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धनंजय मुंडेंशिवाय पोटाचे पाणी हलत नाही. 2014 पासून मी बघतेय. सर्व पुरावे समोर आहेत, मग वाट कशाची बघातय?, असा सवालही करुणा शर्मांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना विचारला. एबीपी माझाशी संवाद साधताना करुण शर्मा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

महिलांबद्दल सहानुभूती असेल देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी तर धनंजय मुंडे यांना पक्षातून हकलून लावलं पाहिजे.  पक्षाचा आधार घेत ही मोठं झालेली आहेत, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली. तसेच महिला आयोगात मी वेळोवेळी गेली, मात्र ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. आजपर्यंत महिला आयोगानं काहीच केलं नाही. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या पदावर योग्य नाही. त्या कोणालाही न्याय देत नाहीत.  रुपाली चाकणकर यांनी धनंजय मुंडेंना खूप पाठिंबा दिला, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला. कालच्या निकालासाठी न्यायालयाचे धन्यवाद मानते. आम्ही 15 लाखांची मागणी केली होती, मात्र ते मिळाले नाहीत, त्यामुळे आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहोत. धनंजय मुंडेची सवय आहे, फुट टाका आणि राज्य करा... स्वतः तोंड उघडत नाही, माझ्या मुलाला उभं केलं. माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सर्वांनी बघितलं आहे. ज्या वेळी माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला. 

मी तोंड उघडलं तर...; करुणा शर्मांचा इशारा-

माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केल्यास 1996 पासून काय काय केलं, हे मी सर्व सांगेल. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंसोबत काय केलं? काय कटकारस्थान रचले. मुंडे साहेबांविरेधात काय कटकारस्थान रचले गेले? किती आका आहे?, हे मी सगळं सांगेन, असा इशारा देखील करुणा शर्मा यांनी दिला. अनेक मोठ्या गोष्टी आहे. मी तोंड उघडलं तर पंकजाताईंचं पण मंत्रिपद जाऊ शकते, असा दावाही करुणा शर्मांनी केला. तसेच तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची बायको आहे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या. 

संबंधित बातमी:

Maharashtra Politics: 6 खासदार ठाकरेंची साथ सोडणार?, कोणाची नावं चर्चेत?; उद्धव ठाकरेंच्या खासदारांची संपूर्ण यादी!

1996 पासूनचं सगळं बाहेर काढणार; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा, VIDEO:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 August 2026 : आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
Dombivli Road Issue : पाच सहाच महिने झाले निवडून आलो, रस्त्यातील खड्ड्यानं बदनाम झालो, डोंबिवलीत सत्ताधारी नगरसेवकाने कवितेतून उडवली खिल्ली
डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झाल्यानं नागरिक त्रस्त, नगरसेवकाकडून सभागृहात खड्यावरील कविता सादर
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget