कल्याण-कर्जत रेल्वे वाहतूक दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिंग्नल यंत्रणा पाण्याखाली
रेल्वे वाहतुकीसह मुंबई आणि परिसरातील रस्त्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कल्याण ते शीळ फाटा, कल्याण ते मुरबाड रोड, कल्याण ते भिवंडी रोड हे तीन मुख्य मार्ग पूर्णपणे बंद आहेत.

ठाणे : मध्य रेल्वेची वाहतूक कल्याण-कर्जतदरम्यान दोन दिवस पूर्णपणे ठप्प राहण्याची शक्यता आहे. मुसळधार ट्रॅकवर असलेल्या सिग्नस यंत्रणा पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. सिग्नल यंत्रणेला दुरुस्तीसाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.
याशिवाय मुसळधार पावसामुळे शेलू आणि नेरळ दरम्यान रुळाखालील खडी वाहून गेली आहे. त्यामुळे या मार्गावरची रेल्वे रुळ दुरुस्तीसाठीही बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. आधीच कल्याण, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच आता रेल्वे प्रवाशांना नव्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
रेल्वे वाहतुकीसह मुंबई आणि परिसरातील रस्त्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कल्याण ते शीळ फाटा, कल्याण ते मुरबाड रोड, कल्याण ते भिवंडी रोड हे तीन मुख्य मार्ग पूर्णपणे बंद आहेत.