एक्स्प्लोर

पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरले, शिंदेंच्या महिला आमदाराचा खळबळजनक दावा; आदित्य ठाकरे म्हणाले...

देवाला धर्माला ही लोकं मानत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत आहेत, लोकांचा बुद्धीभेद करत आहेत

मुंबई : जगभरात ज्याला प्रसिद्धी मिळते अशी ऐतिहासिक पंढरपूरची वारी (Pandharichi wari) आहे. या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात. मात्र, असं असताना एक नवीनच प्रकार समोर आला आहे,  काही अर्बन नक्षलवादी (Naxal) वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हलं आहे. विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता, आमदार कायंदे (Manisha kayande) यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.  आता, आमदार आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवाला धर्माला ही लोकं मानत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत आहेत, लोकांचा बुद्धीभेद करत आहेत. पंढरपूरची वारी अशी आहे जिथे कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना जसे पर्यावरण दिंडी, संविधान दिंडीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेतस, पथनाट्य करतात, असे शो करतात. एक दिवस तरी वारी अनुभवा, हा माणूस कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. सासवड येथे ही लोकं पोहोचतात आणि त्यांच्या वारीचा रुट देखील आहे. क्युआर कोड त्यांनी दिलाय जो ब्लॅकलिस्टेड आहे, असं दिसतंय. पंढरपूरच्या वारीचा ही लोकं गैरफायदा घेत आहेत, अशी माहिती मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिली. 

अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली गैरप्रकार

वारीत अनेक महिला वारकरी आपण पाहातो, तुळशीचं रोप घेऊन काही महिला चालतात. इतर कोणत्या गोष्टींचा प्रचार प्रसार करायचा असेल तर त्यांचा उपयोग करू शकता. काही वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि आम्ही देखील सांगितलं ही या गोष्टीला आळा घाला. सन 2010, 2011 पासून ह्या लोकांवर गुन्हे नोंद आहेत. जामिनावर असलेले लोकं देखील यात आहेत, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली हे सर्व सुरू आहे, असा आरोप करत कायंदे यांनी अंनिसकडे बोट दाखवले आहे. वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. वारीचा गैरफायदा घेऊ नये हाच उद्देश आहे. महिला संविधानाचे पुस्तक घेऊन आम्ही चालतात, संविधानाच्या नावाखाली फेक नॅरोटिव्ह पसरवणारी ही लोकं तेच तर नाहीत ना, असा सवालही कायंदे यांनी विचारला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले

वारीसंदर्भात आमदार मनीषा कायंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा लोकांकडे काही लक्ष देऊ नका, हे कधीही पक्ष बदलतात, सोडून द्या, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच, महाराष्ट्रात 700 हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती आदित्य यांनी दिली. तर, संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा

झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार सरकारवर भडकले; वनमंत्र्यांचं स्पष्टीकरण

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Embed widget