एक्स्प्लोर

दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस, जयंत पाटलांचं नारायण राणेंना उत्तर

मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील पाच वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, असा दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. राणेंच्या या दाव्याला आता जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जयंत पाटलांनी ट्वीट करत म्हटलं की, राणे साहेबांची भाजपच्या वरीष्ठ नेत्यात गणती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी, कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळला तर माझ्या ज्ञानात भर पडेल. माझ्या पुरते सांगायचे झाले तर माझी भाजपच्या कोणत्याही वरीष्ठ नेत्याशी भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा झाली नाही म्हणून हा खुलासा.

मी शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील पाच वर्षे सरकारच्या विरोधात विधीमंडळात लढत होतो. दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपामध्ये असते, नारायण राणेंचा दावा

नारायण राणेंनी काय म्हटलं होतं?

जयंत पाटील हे या आणि पुढील पाच वर्षे देखील मीच मंत्री असेन असं म्हणाले असतील. कारण, आता जर भाजपचं सरकार असतं तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारी त्यांनी दर्शववी होती. ते आपलं काम करतात बाकी काही बोलत नाहीत. ते माझ्याबद्दल देखील बोलले. पण, मी त्यांचा समाचार इस्लामपूर येथे जाऊन घेणार आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी भाजपच्या नेत्यांशी त्यांची झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
Bhagat Singh Koshyari on DJ Ban: महाराष्ट्रातील डीजे बंदीवर भगतसिंह कोश्यारींचं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले, 'कान फाटेपर्यंत...'
महाराष्ट्रातील डीजे बंदीवर भगतसिंह कोश्यारींचं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले, 'कान फाटेपर्यंत...'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Embed widget