एक्स्प्लोर

मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा काम करत होती. तर, त्यापूर्वीही काही अभिनेत्यांसाठी तिने मॅनेजर म्हणून काम केलं आहे.

मुंबई - राजधानी मुंबईतील बहुचर्चित दिशा सालियन (Disha salian) मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतिश सालियान यांनी दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडे आपला जबाब नोंद केला होता. त्यानंतर, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार, सीबीआयने सतिश सालियान यांच्या जबाबावर दिशाच्या मृत्यूप्रकरणात अखेर गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदवला आहे. मात्र, या एफआयआरमध्ये (FIR) नेमकं कोणाला आरोपी करण्यात आलंय, ते अद्याप समोर आलं नाही. 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा काम करत होती. तर, त्यापूर्वीही काही अभिनेत्यांसाठी तिने मॅनेजर म्हणून काम केलं आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूपूर्वी अवघ्या 6 दिवस अगोदर दिशाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी, दिशाने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. तर, दिशाने आत्महत्या केली असून तिच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. तसेच, दिशावर अत्याचारकरून हत्या केल्याचा देखील आरोप करण्यात येत होता. अखेर, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशाच्या मृत्यूप्रकरणी सहा वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला. 

भा.दं.वि. कलम ३०२ (हत्या) ३७६ (सामूहिक अत्याचार), १२०(ब) कट रचणे, २०१ (पुरावे नष्ट करणे) तसेच २१७ आणि २१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची  माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय (CBI) चौकशी आणि एफआयआर (FIR) दाखल करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झालेला. दरम्यान, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती.

Disha Salian Death Report : दिशा सालियन मृत्यू अहवालात काय? 

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. 

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
निवृत्तीला फक्त दोनच दिवस बाकी, पण पैशांचा मोह नडला, 80 हजारांची लाच मागितली, मालेगाव महापालिका आयुक्तांवर कारवाई 
निवृत्तीला फक्त दोनच दिवस बाकी, पण पैशांचा मोह नडला, 80 हजारांची लाच मागितली, मालेगाव महापालिका आयुक्तांवर कारवाई 
Pradeep Purnekar : ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल
ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकरेंचा सवाल
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget