Jammu Kashmir Student Beaten For Writing Jai Shri Ram : उत्तर प्रदेशातील मुझफ्फनगरमधील घटना समोर आली असताना असाच प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला आहे. बोर्डावर "जय श्री राम" असं लिहिल्याने सरकारी शाळेच्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांनी मारहाण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अजून तपासणी सुरु आहे. 


काय आहे नेमके प्रकरण?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील कुलदीप सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षक फारुक अब्दुल्ला आणि प्निन्सिपल मोहद हाफीज यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने वर्गात ब्लॅक बोर्डवर "जय श्री राम" लिहिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकाविरोधात भारतीय दंड विधान 323 (जाणूनबुजून जखमी करणे), 342 (चुकीच्या पद्दीतीने कैदेत ठेवणे), 504 (जाणूनबुजून अपमान करणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 75 ( मुलांविरोधात क्रूरता) असे आरोप लावण्यात आहेत. कठुआ येथील घटनेनंतर उपायुक्तांनी अधिसूचना जारी करुन याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.


एफआयआरमध्ये (FIR) असे म्हटले आहे की, मुलाने बोर्डवर जय श्री राम लिहिले होते. शिक्षाक फारुख यांनी वर्गात येऊन हा प्रकार पाहिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांसमोर मुलाला वर्गाबाहेर नेले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाला मुख्याध्यापकांच्या खोलीत नेले आणि दोघांनी खोलीला कुलूप लावून मुलाला बेदम मारहाण केली. जर त्याने पुन्हा असे कृत्य केले तर ते त्याला ठार मारतील, असे सांगितले. या मारहाणीमुळे मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. 


उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील व्हिडीओ व्हायरल


उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील शाळेत एका मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक शिक्षिका इतर मुलांना व्हिडीओमधील मुलाला चापट मारायला लावत होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये एक शिक्षिका वर्गात खुर्चीवर बसली आहे. समोर एक मुलगा रडत आहे. शिक्षिकांच्या सांगण्यावरुन वर्गात बसलेले विद्यार्थी एकामागून एक येतात आणि मुलाला चापट मारतात. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलाची चूक एवढीच होती की त्याला पाढा आठवत नव्हता.


इतर महत्वाच्या बातम्या


Sana Khan Case : सनाचा मुलगा वारंवार तिच्या मृतदेहाबाबत विचारणा करतोय, त्याला काय उत्तर द्यावं?; सना खान यांच्या आईचा नागपूर पोलिसांना प्रश्न