जम्मू काश्मिर : रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबणार
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2018 06:09 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये रमजानच्या महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली जाणार नाही. पण दहशतवाद्यांनी हल्ला केला तर स्वत:च्या आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांना प्रत्युत्तर कारवाई करता येणार आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमध्ये सशर्त सीझफायरचा आदेश जारी केला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या आदेशाची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली.