देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


 'चांद्रयान-3 साठी पुढचे 13-14 दिवस खूप महत्त्वाचे'; मोहिमेची बहुतेक उद्दिष्टे पूर्ण होणार - एस. सोमनाथ 


 चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या लँडर विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर, रोव्हर प्रज्ञान चंद्रावर चालताना डेटा गोळा करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) रोव्हरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, पुढील दोन आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. (वाचा सविस्तर) 


पंतप्रधान मोदी आज B20 शिखर परिषदेला संबोधित करणार; आर्थिक विकासाला चालना देण्यावर लक्ष


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार 27 ऑगस्ट रोजी) B20 शिखर परिषद 2023 (B20 Summit India 2023) ला संबोधित करणार आहेत. या संदर्भात माहिती देताना पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) X (ट्विटर) वर लिहिले की, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मी बी20 समिट इंडिया 2023 ला संबोधित करेन. (वाचा सविस्तर)


 चंद्रावरील 'शिवशक्ती' पॉईंटवर फिरताना दिसतोय प्रज्ञान रोव्हर; ISRO ने जारी केला लेटेस्ट व्हिडीओ 


 चांद्रयान 3 यशानंतर आता त्या ठिकाणी उतरलेले प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) अपडेट्स येत आहेत. इस्त्रोने याबाबतचा लेटेस्ट व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये शिवशक्ती पॉईंटवर चांद्रयानचे रोव्हर फिरताना दिसत आहे. भारताच्या चांद्रयान 3 ने बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आणि इतिहास घडवला होता.  (वाचा सविस्तर)


 हरियाणातील नूहमध्ये पुन्हा एकदा शोभा यात्रा काढण्यासाठी हिंदू संघटना ठाम; पोलीस प्रशासन सतर्क, 29 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवा बंद


हरियाणामधील नूहमध्ये (Nuh) पुन्हा एकदा हिंदू संघटनांनी शोभा यात्रा (Rally) काढणार असल्याची घोषणा केली आहे. ही शोभा यात्रा 28 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु प्रशासनाने ही शोभा यात्रा काढण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. (वाचा सविस्तर)


अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने अस्तित्व संपणार, जळगाव बँकेत विलिनीकरणास आरबीआयची मंजुरी 


अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे (Akola Merchant Co-operative Bank Ltd) अस्तित्व संपणार असून त्याच्या विलीनीकरणास भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) मंजुरी दिली आहे. अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचं द जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (The Jalgaon Peoples Co-operative Bank Ltd) विलिनीकरण होणार आहे. या निर्णयाची 28 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार आहे.  (वाचा सविस्तर)


कोरोनाचा कमबॅक; अमेरिकेसह अनेक देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, 'ही' आहेत लक्षणं 


 जर तुम्ही विचार करत असाल की कोरोनाचा धोका आता संपला आहे, तर तुम्ही चुकत आहात. अर्थात कोरोनाची (Corona) तीव्रता कमी झाली आहे, पण कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोना व्हायरस त्याचं स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. BA.2.86 नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा आहे. (वाचा सविस्तर)


वृषभ, कन्या, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या नोकरदार लोकांना थोडं सावध राहण्याची गरज आहे.  तर, धनु राशीच्या लोकांचे आज रखडलेले काम पूर्ण होईल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.  (वाचा सविस्तर)


27th August In History: गायक मुकेश यांची पुण्यतिथी, वन्यजीव संरक्षण कायदा संमत; आज इतिहासात


आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आजच्या दिवशी संमत झाला, यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले होते. राज कपूर यांचा 'आवाज' म्हणून ओळख असणारे गायक मुकेश यांची आज पुण्यतिथी आहे.  आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. (वाचा सविस्तर)