Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन्...; पहलगाममधील अंगावर काटा आणणारा थरार
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत, अशी विचारणा केली. तसेच काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पँटही काढायला सांगितली, त्यानंतर गोळ्या झाडल्या, अशी भयावह माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी-
दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मिरमध्ये येत असतात. यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. पण बऱ्याच काळानंतर काश्मिरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.
महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू-
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखामींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

























