एक्स्प्लोर

मार्केटिंग जॉब, स्टँडअप कॉमेडी तरीही इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतेय जेमी लिव्हर; स्टार किड असूनही प्रसिद्धीपासून दूर

Jamie Lever Struggle Story: जेमी लीवरनं 2012 मध्ये करिअरला सुरुवात केली. पण स्टार किड असूनही ती प्रसिद्धीपासून मात्र दूरच राहिली.

Jamie Lever Struggle Story : स्टार किड्सना नेहमीच नेपोटिज्मच्या तराजूत तोललं जातं. गेल्या अनेक दिवसांपासून नेपोटिज्मवरुन सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. नेहमीच असं म्हटलं जातं की, स्टार किड्सना मेहनतीशिवाय इंडस्ट्रीमध्ये काम मिळतं. आपल्या आई-वडिलांच्या नावाच्या जोरावर स्टार किड्स इंडस्ट्रीत मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकतात. पण एका स्टार किड्सकडे पाहिलं तर या सर्व चर्चा खोट्या ठरतात. आजही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत, जे प्रसिद्धीसाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्ट्रगल करताना दिसत आहेत. असंच एक नाव म्हणजे, जेमी लिव्हर (Jamie Lever). प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी. 

जेमी लिव्हरने 2012 मध्ये करिअरला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेमी लिव्हर मार्केट रिसर्च एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पण जेमीला काहीतरी मोठं करायचं होतं. त्यानंतर जेमीनं स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम करायला सुरुवात केली. जेमी बॉलिवूड स्टार्सची मिमिक्रीही करते. सोशल मीडियावर तिच्या मिमिक्री व्हिडीओचा बोलबाला आहे. लोकांना जेमीची कॉमेडी, अभिनय आणि मिमिक्री खूप आवडते. जेमी खूप प्रतिभावान आहे, परंतु तरीही तिला अद्याप इंडस्ट्रीमध्ये हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे, जेमी स्टार किड आहे. 

12 वर्षांनंतरही जेमी आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडतेय. लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता जॉनी लिव्हरची मुलगी असल्याचा तिला अजिबात फायदा झाला नाही. ती स्वबळावर पुढे जात आहे, असं स्वतः जेमीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं. दरम्यान, आता ती आपल्या नव्या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पॉप कौन' ही नवीकोरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधून जेमी झळकणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

स्टार किड असलं म्हणून सगळं आयतं चांदीच्या ताटात मिळत नाही : जेमी लीवर 

जेमीने तिच्या स्ट्रगलसंदर्भात एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, "जर तुम्ही सेलिब्रिटींचं मूल असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला सर्व काही आयतं चांदीच्या ताटात मिळतं. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट्स, सिनेमे मिळतीलच असंही नाही. माझा करिअर ग्राफ हे यासाठीच उत्तम उदाहरण आहे. यामागे नशीब हे सर्वात मोठं कारण आहे, असे मी मानते. कदाचित वाट पाहणं माझ्या नशिबातच लिहिलं आहे." पुढे बोलताना जेमीनं म्हटलं होतं की, "वडील सुपरस्टार असल्याचा फायदा तिला अजिबात मिळाला नाही. कामासाठी वडिलांनी कधीही तिची कोणाकडे शिफारस केलेली नाही. तिनं जे काही काम केलं आणि तिला जे काही काम मिळालं, ते स्वबळावरच मिळालं." 

मी कोणाच्या पाठबळावर नाही तर स्वबळावर करिअर बनवतेय : जेमी लीवर 

जेमी म्हणाली होती की, "मी कोणाच्या पाठबळावर नाही तर स्वबळावर करिअर बनवतेय. याला मी माझी स्ट्रगल स्टोरीच म्हणेन की, उशीर झाला पण लोक माझ्या कामाची दखल घेत आहेत. मीही त्यात समाधानी आहे. अनेकांची कारकीर्द काही वर्षांतच संपते. मी अजूनही हळूहळू पुढे जात आहे." 

View this post on Instagram
 
A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

दरम्यान, कॉमेडी आणि मिमिक्री करण्यासोबतच जेमी लीवर दोन चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिनं कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं' या चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय ती 'हाऊसफुल 4' मध्येही दिसली आहे. जेमी लीवर लवकरच 'पॉप कौन' या कॉमेडी सीरिजमध्ये दिसणार आहे. पॉप कौनचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो लोकांना खूप आवडला. ट्रेलर कॉमेडीनं भरलेला आहे. ही सीरिज 17 मार्चपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज केली जाणार आहे. जेमीला अद्याप चित्रपटांमध्ये अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. आता पॉप कौन या सीरिजमधून ती अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवू शकते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

कॉमेडीचा विचार केला तर जेमीला तोड नाही. इंस्टाग्रामवर जेमीचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. जेमी म्हणजे, टॅलेंटचा खजिना. अभिनयापासून ते मिमिक्री आणि कॉमेडीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ती पारंगत आहे. आता 'पॉप कौन'मधून जेमी कोणत्या अंदाज प्रेक्षकांसमोर येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
Raj Thackeray : 15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Local Train: Raj Thackeray लोकलने चर्चगेटला, मतदार यादीतील 'घोटाळ्या'विरोधात MNS चा मोर्चा
Hasan Mushrif ON Voter List: सदोष मतदार याद्यांवरुन निवडणुका नकोत, मुश्रीफांचा घरचा आहेर
Satyacha Morcha Voter List : मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर मविआकडून स्टेजची उभारणी
Satyacha Morcha : मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?
Raj Thackeray Satyacha Morcha : मतदार याद्यांमधील घोळविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
Raj Thackeray : 15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Satyacha Morcha Mumbai LIVE Updates : मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल, जाणून घ्या प्रत्येक अपडेट, एका क्लिकवर
मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल, जाणून घ्या प्रत्येक अपडेट, एका क्लिकवर
Embed widget