एक्स्प्लोर

Laxman Hake: अंतरवाली सराटीत आता ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लढाई, लक्ष्मण हाके प्राणांतिक उपोषणाला बसणार

Maratha OBC Reservation: गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, असे चित्र निर्माण झाले होते. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही दिसून आला होता. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण

सोलापूर: गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातंर्गत शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसी (OBC Resrvation) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी लावून धरली आहे. तसेच कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आता आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे. लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपली भूमिका मांडली आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणात नवे वाटेकरी निर्माण होऊ नयेत,  ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणाचे रक्षण व्हावे, यासाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. मात्र, लक्ष्मण हाके हेदेखील आंतरवाली सराटीतच उपोषणाला बसल्यास राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलिसांकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

लक्ष्मण हाके यांनी व्हीडिओत नेमकं काय म्हटलं?

ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे. आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये, शासनाने तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही अंतरवाली सराटी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे.

 अंतरवाली सराटी किंवा आजूबाजूच्या तिथल्या सर्व लोकांशी माझी फोनवरून तशी चर्चा झालेली आहे. उद्या संध्याकाळी आम्ही अंबड येथे मीटिंग घेत आहोत. आजूबाजूच्या गावांमध्ये एक छोटासा दौरा करत आहोत आणि ओबीसी आरक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरायची लढाई रस्त्यावर उतरायची तयारी करत आहोत आणि ओबीसीच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय, संविधानामधील तरतुदी या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट होण्यासाठी आम्ही संघर्षासाठी तयार होत आहोत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. 

आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव, बीड जिल्ह्यात तणाव कायम, आता केज शहर बंदची हाक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget