एक्स्प्लोर
एका दिवसात अध्यादेश काढण्याएवढे पुरावे देण्यासाठी तयार, आता वेळ मागू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : सरकारने आता वेळ मागू नयेत असे मनोज जरांगे म्हणाले.

Manoj Jarange
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. सरकारला चार दिवसांचा वेळ दिला असून, आजचा दुसरा दिवस आहे. एका दिवसात आदेश काढता येईल एवढे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांनी येथे यावे आम्ही त्यांना पुरावे देण्यासाठी तयार आहे. सरकारने आता कारणे देऊ नयेत. आता सरकराने वेळ मागवण्याची गरज नाही. एका दिवसात राज्यपाल यांची भेट घेऊन अध्यादेश काढता येईल. त्यामुळे सरकारने आता वेळ मागू नयेत असे मनोज जरांगे म्हणाले.
आणखी वाचा























