Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे निघाले, आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलक सज्ज
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज अंतरवाली सराटीवरुन मुंबईला मोर्चा निघणार आहे. मनोज जरांगे नेतृत्त्व करणार
LIVE

Background
Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा काढला जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता मराठा आंदोलक अंतरवाली सराटीवरुन निघतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंगळवारी ओएसडी पाठवून मनोज जरांगे यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नये, यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टलाच मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. मनोज जरांगे पाटील यांनी उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसण्यास परवानगी नाकारली आहे.
मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकार बरोबर चर्चा करावी : मंत्री दादा भुसे
मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यात दुमत असल्याचे काही कारण नाही..परंतु, मुंबई, कोकण, महाराष्ट्र व देशात सध्या गणपती बाप्पांचा उत्सव सुरू आहे..या कालावधीमध्ये आंदोलनापेक्षा चर्चेतून ते पुढे आले तर एक समाधानकारक तोडगा निघू शकतो..
Beed Maratha Reservation: बीड जिल्ह्यातून ट्रक भरून मराठा समाज अंतरवली सराटीच्या दिशेने
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढतोय. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीत दाखल झाले. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघाले आहेत. एक ना अनेक ट्रक अशा स्वरूपात अंतरवली सराटीवरुन मुंबईला निघाले होते.























