Jalna:'खासदारकी माझ्या बापाची नाही, त्याबाबत पक्ष ठरवेल'; दानवेंचा खोतकरांना स्पष्ट इशारा
Jalna News: जालना लोकसभा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागा आहे: रावसाहेब दानवे
![Jalna:'खासदारकी माझ्या बापाची नाही, त्याबाबत पक्ष ठरवेल'; दानवेंचा खोतकरांना स्पष्ट इशारा maharashtra News Jalna Raosaheb Danve warns Arjun Khotkar from Jalna Lok Sabha Constituency Jalna:'खासदारकी माझ्या बापाची नाही, त्याबाबत पक्ष ठरवेल'; दानवेंचा खोतकरांना स्पष्ट इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/13/d826f7e3b31c75e2bed4cd4d9a7b23ce166038857442289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna News: जालना जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर काही दिवसांपूर्वी एकत्र आले. मात्र अजूनही जालना लोकसभा मतदारसंघावरील आपला दावा कायम असल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खोतकर यांना तुमचा मतदारसंघ सोडणार का? असा प्रश्न विचारताचा, खासदारकी काय रावसाहेब दानवेच्या बापाची आहे का? असे म्हणत हा भाजपचा मतदारसंघ असून, भाजपकडेच राहणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, खोतकर यांना खासदारकी सोडण्यासाठी ती काय रावसाहेब दानवेच्या बापाची थोडी आहे. समजा उद्या मी खासदारकी खोतकर यांच्यासाठी सोडली, पण पक्ष सोडेल का?, मलाच म्हणतील तू जा घरी आम्ही दुसरा आणतो धरून. त्यामुळे खासदारकी सोडणे माझ्या हातात नाही. ती भारतीय जनता पक्षाची जागा आहे. गेली 25 वर्षे मी येथून निवडून आलो आहे. तर एकूण 9 वेळा भाजपने हा मतदारसंघ स्वतः जवळ ठेवला आहे. त्यामुळे ही जागा सोडणे माझ्या हातात नाही,असे दानवे म्हणाले.
आमचा वाद मिटला आहे...
तर पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, खोतकर माझे मित्र आहेत. आम्ही एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहोत. राजकारणात कुणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसते. आम्ही दोघे एकत्र बसलो आणि आमचे भांडण मिटले. आम्ही दोघांनी एकमेकांना साखर खाऊ घातली,गळ्यात गळे घातले. त्यामुळे आमच्यात आता काही राहिले नाही.
शिरसाट नाराज नाहीत...
शिवसेना आमदार संजय शिरसाट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हाणाले की, कुणीही नाराज नाही, तुम्ही उगाच पाणी घालू नका. अडीच वर्षे हे सरकार चालणार आहे. आम्ही सर्वांना सोबत घेणार आहोत. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. तसेच पुढच्यावेळी 200 जागा आम्ही निवडून आणणार आहोत असेही दानवे म्हणाले.
दानवे-खोतकरांची दोस्ती अडली 'लोकसभे'वर...
दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद काही नवीन नाही. मात्र सद्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आहे. पण वाद मिटला असला तरीही खोतकर यांना लोकसभा मतदारसंघ हवा आहे. मात्र दानवे काही सोडायला तयार नाही. त्यामुळे सद्यातरी ही दोस्ती वरवरची असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभा मतदारसंघाच्या दाव्यावरून पुन्हा एकदा दानवे आणि खोतकर आमने-सामने आल्यास नवल वाटणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)