एक्स्प्लोर

'माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल, तुझ्यासारखा मस्ती असलेला मॅनेजर बघितला नाही!'; भाजप आमदाराची बँक मॅनेजरला शिवीगाळ

भाजप आमदाराच्या दमदाटी विषयी सांगत याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे सांगितलं आहे .

Jalna: जालन्यातील भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी एका बँक मॅनेजरला फोनवरून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या फोनवरील संवादाची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली असून आमदार कुचे यांनी एका शेतकऱ्याचे थकीत कर्ज प्रकरण निकाली काढण्यासाठी बँक मॅनेजरला शिवीगाळ करून धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. (BJP MLA Narayan Kuche)

नेमके प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील जामखेड येथील युनियन बँकेचे मॅनेजरला आमदार नारायण कुचे या भाजपच्या आमदारांनी फोन केला. एका शेतकऱ्याच्या थकीत कर्ज प्रकरणात त्यांनी बँक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. या संभाषणाची क्लिप गेल्या तीन दिवसांपासून व्हायरल होत आहे . ' तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय . एवढा माज .. एफडी वाल्याला त्रास ..ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा ' मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं . नाही ऐकलं तर हाताने समजावून सांगतो आल्यावर ..तुमची इच्छा असेल तिथे तर .. ' अशा शब्दात थेट धमकी दिली . दरम्यान या प्रकारामुळे युनियन बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस डी एच गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना भाजप आमदाराच्या दमदाटी विषयी सांगत याप्रकरणी बँक कर्मचारी संघटनेने जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे सांगितला आहे .

ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय संभाषण झालं?

आमदार कुचे -- हॅलो, मॅनेजर साहेब आवाज येतोय आपल्याला?

बँक मॅनेजर -हो सर नमस्कार.

आमदार कुचे ::- तुम्ही राव आमचं काम ऐकत नाही.. माझ्या पद्धतीने तुमच्या ऑफिसमध्ये बँकेत यावं लागेल मला..

बँक मॅनेजर :- सर ते आपल्या हातात नाही ना, मी हेड ऑफिसला त्यांची रिक्वेस्ट पाठवली आहे, रिक्वेस्ट लेटर..

आमदार कुचे :- एवढी मस्ती आलेला मॅनेजर मी कधी पाहिला नाही...

बँक मॅनेजर ::- ते सर थकीत असल्यामुळे, त्यांचे खाते फ्रीज आहे.

आमदार कुचे ::- "तुम्हाला एवढी मस्ती असेल तर नीट करायला मी लय पक्काय, एवढा माज ,एफ डी वाल्याला त्रास, ग्राहक सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास आहे का तुमचा.
"जसं काय तुमच्या बापाचा आहे. तुम्ही सरकारच्या जीवावर जितू राहिले. आम्ही सरकारचे प्रतिनिधी एवढा मात चढला आहे का तुम्हाला..?

आमदार कुचे ::- तूला तीनदा समजून सांगितले..#####दुसरा फोन आहे हा..

बँक मॅनेजर :- सर मी पाठवले आहे त्यांचे लेटर वरती..

आमदार कुचे ::-काय पाठवलं?#####नीट शिफारस कर ना.. जरा दाखवू का तुला.. रेकॉर्डिंग करून टाक तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली.

बँक मॅनेजर::- थकीत वाल्यांचे हेड ऑफिस वरून लॉक होत असतं, तिथून निघत असतं. त्यांचा अर्ज फॉरवर्ड केलेला आहे सर.

आमदार कुचे ::- "मी चांगल्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी हाताने समजून सांगतो आल्यावर.. तुमची इच्छा असेल तिथे तर..

बँक मॅनेजर::- पाठवले आहे सर वाटल्यास मी तिथला पण नंबर देतो. माझ्या ऑफिसचा..

आमदार कुचे ::-- रोहित धुळे म्हणून आहे त्याला ग्राहक सेवा केंद्र पाहिजे ते करून द्या तिथे.

बँक मॅनेजर ::- - हा हा हो सर...

आमदार कुचे:- - ग्राहक सेवा केंद्र करून द्या त्याचं.
पाठवतो मी त्याला आणि ते बँकेचे मार्गी लावा..

बँक मॅनेजर::- ठीक आहे सर

बँक कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकारी व एसपींकडे तक्रार

थकीत कर्जामुळे संबंधित शेतकऱ्याची एफडी बँकेच्या नियमानुसार गोठवली जाते . कर्जाची रक्कम फेडेपर्यंत हा पैसा तर शेतकऱ्याला वापरता येत नाही .अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी संबंधित व्यक्तीच ऐकून बँकेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात .हा सगळा प्रकार व या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचं बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं .

हेही वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
Embed widget