एक्स्प्लोर

न्यायलयाच्या आडून मला टार्गेट केलं जातेय, खडसेंचा थेट आरोप

Eknath khadse :  भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा वापर करत मला टार्गेट करत असतील असा आरोप, राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Eknath khadse :  भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा वापर करत मला टार्गेट करत असतील असा आरोप, राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला. 

भोसरी जमीन प्रकरणी हेमंत गावंडे यांनी आपल्या  परिवार विरोधात तक्रार दिली होती. राजकीय पदाचा दुरुपयोग करून कमी दरात जमीन खरेदी केल्याची ही तक्रार होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी एसीबीकडे दिली होती. एसीबीने याची चौकशी करून यात तक्रारीनुसार कोणतेही तथ्य नसल्याचा क्लोजर रिपोर्ट  पुण्याच्या न्यायालयात दिला होता. यात कोणतेही तथ्य नसल्याने हे प्रकरण बंद करण्यात यावे, असं म्हटलं होतं. दोन हजार अठरामध्ये हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. आतापर्यंत यामध्ये केवळ तारखावर तारखा सुरू होत्या. आता इतक्या दिवसानंतर सरकारने याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी हेमंत गावंडे आणि एसीबीने  न्यायालयात केली होती. या मागणीनुसार  न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ते या सरकारला चपराक असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. 

एसीबीवरही पुणे न्यायालयाने ताशेरे ओढताना म्हटलं आहे की, न्यायालयाचा आधार घेत आरोपीला म्हणजेच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे,असं खडसे यांनी म्हटलं आहे. तपास यंत्रणा एसीबी आपल्या कर्तव्यावर प्रामाणिक नसून,  सत्तेत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या तालावर नाचत असल्याचं सांगत जबाबदार तपास यंत्रणांनी जनतेशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे, असं मत न्यायालयाने  व्यक्त केल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. 

आरोपीवर अटकेची कायम टांगती तलवार ठेऊन आरोपीकडून काही तरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, उदा पक्षांतर किंवा शांत बसवले जाऊ शकते. तपास यंत्रणेने केलेला तपास पाहता या मध्ये आरोपीला अटक करून कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याने याबाबतचा अंतिम अहवाल निश्चित करण्यात येण्याची आवश्यकता असल्याचं मतही  न्यायालयाने व्यक्त केल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
ही चौकशी दीर्घकाळ न 31 जानेवारी 2023पर्यंत करून त्याचा अहवाल नायालयत सादर करण्यात यावा. त्यासाठी कोणालाही अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं मत ही न्यायालयाने नोंदविले आहे, असेही खडसे यांनी म्हटलं आहे.

ही एक युनिक केस आहे की सरकार याचे समर्थन न करता विरोधात समर्थन करीत आहे. शिवाय सत्तेचा उपयोग करीत आपल्याला छळवणूक करण्याचा किंवा आपल्याकडून काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.तपास यंत्रणा कोणाच्या तरी तालावर नाचत असल्याचं सांगत कोर्टाने या प्रकरणात तपास यंत्रणेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाचे हे ताशेरे पाहता सत्ताधारी पक्ष हा विरोधक नामशेष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव दूध संघातही पोलिस तपासाच्या नावाखाली छळ केला जात आहे. भोसरी एमआयडीसी घोटाळा प्रकरणी आपल्यावर कारण नसताना विविध चौकशा लाऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget