एक्स्प्लोर

Jalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करुन मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवला; आरोपीला ताब्यात देण्यावरुन गावकऱ्यांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

Jalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंडगाव इथे घडली.

Jalgaon News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करुन तिचा खून (Murder) केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीवरुन पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंडगाव इथे घडली. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या गावकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. 

गोंड गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवल्याची धक्कादायक घटना 1 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या घटनेतील संशयिताला गुरुवारी (3 ऑगस्ट) पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुन्ह्याच्या घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी गावात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत तीन पोलीस जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला

स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय 19 वर्षे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मुलीवर लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत तरुणाने मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची कबुली अटकेतील संशयिताने पोलिसांसमोर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

दरम्यान मुलगी सापडत नसल्याने मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन आंदोलन करत अत्यसंस्कार न करण्याचा पावित्रा घेतला होता. 

दुर्गंध येऊ लागल्याने हत्या झाल्याचं उघड

दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार 1 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय 19, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली. 30 जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलावले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारुन तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता, अशी कबुली संशयिताने पोलिसांना दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी, वाहनाचंही नुकसान

संशयित स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली असून त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी संशयिताला 55 ते 60 पोलीस बंदोबस्तात घटनास्थळाच्या पडताळणी जात गोंडगाव येथे नेत असताना, संशयिताला आमच्या हवाली करा, म्हणत ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यात संशयिताला ताब्यात घेण्यावरुन पोलीस आणि जमाव यांच्यात वाद झाला. या वादातून पोलिसांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून गोंडगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

हेही वाचा

Doctor Suicide : राज्यातला टॉपर विद्यार्थी, मात्र जळगावच्या तरुण डॉक्टरनं स्वतःला संपवलं, केईम हॉस्पिटलमधील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget