Jalgaon : ऑडीटर साहेबांनी चक्क अंतर्वस्त्रावर केले ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण! जिल्हयात खळबळ, फोटो सोशल मीडीयावर व्हायरल
Jalgaon News : बोदवड तालुक्यात घडलेल्या प्रकारामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Jalgaon News : केवळ अंतर्वस्त्रावर लेखा परीक्षण अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत लेखापरीक्षण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्हयात बोदवड तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके?
ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण चक्क चड्डी-बनियानवर
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील एनगाव ग्रामपंचायतीचे चौदाव्या वित्त आयोगाचे लेखा परीक्षण करण्यासाठी दोन दिवस पूर्वी नाशिक येथील पथक जळगाव जिल्ह्यात आले होते. या पथकाने एनगाव ग्रामपंचायतीचे लेखा परीक्षण गावातील एका खोलीत बसून चक्क चड्डी बनियानवर राहून ते केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त
सरपंच आणि ग्रामसेवकांनी लेखा परीक्षण अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी वेगळी राहण्याची व्यवस्था केल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत. या घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली असून त्या संदर्भात योग्य ती चौकशी कडून कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने लेखी परिक्षण नेमके का केले?
दरम्यान, 14 वा वित्त आणि 15 वित्त आयोगाचे लेखीपरीक्षणासाठी नाशिकचे तीन अधिकारी बोदवड गावात आले होते. अधिकाऱ्यांनी गावामधील एका घरात हे परिक्षण केल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी केवळ अंतर्वस्त्रावर लेखीपरीक्षण केल्याने आर्श्चय व्यक्त केले जात असून हा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे. या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने लेखी परिक्षण नेमके का केले? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. याचे कारण मात्र अद्यापही समजले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Patra Chawl Scam : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
Murbad News : मुरबाडच्या गावकऱ्यांची व्यथा; चक्क होडीतून करावा लागतोय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना प्रवास
Maharashtra Rains Live Updates : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत
Todays Headline 5th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
