एक्स्प्लोर

जळगावात दोन गुलाबरावांच्या लढतीत कोणाला सर्वाधिक काटे टोचणार? देवकरांनी आव्हान देताच चर्चा रंगली

जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडे विरोधात लढण्यासाठी प्रबळ उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान राहिले आहे.

जळगाव :   जळगाव ग्रामीण मतदारसंघात (Jalgaon News)   उद्धव ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्याने ते निवडणूक लढू शकत नसल्याच मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले होते.  त्याला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उत्तर दिले असून आपण त्यांच्या विरोधात लढणार असून दोन गुलाबात टक्कर होणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन गुलाबरावमध्ये होणारी काट्याची टक्कर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय राहणार आहे. 

जळगाव ग्रामीण मतदार संघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं पाहायला मिळत आहे. या जागेवर  शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्याने त्यांनी तलवार म्यान केली आहे. संजय राऊत यांनी या बाबत आपला उमेदवार कोण  आहे,त्याचे नाव जाहीर करावे आणि निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान ,मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना दिले होते. या विषयावर अद्याप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिक्रिया आली नसली तरी महाविकास आघाडी नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र आपण या जागेवर उमेदवारी करणार असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार असल्याचा दावा केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान राहिले आहे. शिवसेना पक्षाची ही जागा असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील  यांनी उमेदवार जाहीर करण्याचे खुले आव्हान संजय राऊत यांना केले आहे. सेनेचा मतदार संघ असताना  उमेदवार नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने  आपली तलवार म्यान केली असल्याचं  म्हटल होते. 

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या आव्हानाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही  प्रतिक्रिया देण्यात आली  आहे.  मतदारसंघ सेनेकडेच राहिला आहे. त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील जनतेसाठी काम केले आहे. आमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी, गद्दार नाही तर  खुद्दार असे अनेक उमेदवार आहेत. आम्ही ही निवडणूक पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण काम करणार असल्याच सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी म्हटले आहे.

गुलाब विरुद्ध गुलाब?

या  वेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र ही जागा मेरिटप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार असल्याने, आपण या जागेवर उमेदवारी करणार आहे.  त्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्यापासून तयारी करत आहोत. या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आपण लढणार असून,गुलाबराव विरोधात गुलाबराव अशी लढत नक्की होणार असल्याचं म्हटल आहे.  मंत्री गुलाबराव पाटील आपल्या बाबत जनतेच्या मनात दिशाभूल करत आहेत. उमेदवार नाही अस त्यांचं बोलणे,म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत,एकाच रात्रीतून उमेदवार तयार होऊ शकतो असेही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी म्हटले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaUstad Zakir Husaain passed Away : वयाच्या 73व्या वर्षी झाकीर हुसैन यांचं निधनCabinet Expansion Special Report : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 45% यंग ब्रिगेडSpecial Report Opposition Party Vs Mahayuti : विरोधकांचा सरकारवर आरोप, चहापानावर बहिष्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
छगन भुजबळांची पक्षानं घेतली दखल, लवकरच मिळणार मोठी संधी, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न 
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप : नरेंद्र भोंडेकर
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Shivsena : एकनाथ शिंदेंवर पूर्ण विश्वास ते अडीच वर्षांच्या मंत्रिपदाची अट, शिवसेनेच्या 11 मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर सही
शिवसेनेच्या सर्व मंत्र्याकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी, अडीच वर्षांच्या अटीसह प्रमुख मुद्दे कोणते?
Embed widget