एक्स्प्लोर

काल गुलाबराव पाटलांकडून अभिवादन, आज शिवसैनिकांकडून दुग्धाभिषेक करून महापुरूषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण  

Jalgaon News Update : मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे काल प्रथमच जळगावात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते.

जळगाव : धरणगावमध्ये काल शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी अभिवादन केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे शिवसैनिकांनी (Shiv Sena) आज दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले आहे. गद्दारांचा महापुरुषांच्या पुतळ्यास स्पर्श झाल्याने शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुद्धीकरण केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.  

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे काल प्रथमच जळगावात आले होते. त्यांच्या मतदारसंघातील धरणगाव येथे गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन केले होते. परंतु, याच पुतळ्यांचे शुद्धीकरण आज शिवसैनिकांनी केले आहे.  

गुलाबराव पाटील यांना महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून धरणगावमध्ये शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना  महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून पुतळ्यांचे शुद्धीकरण केले, अशी माहिती शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले.  

गुलाबराव वाघ म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेर यांनी करोनाच्या काळात चांगलं काम केलं. त्यामुळे संपूर्ण जगभरातून उद्धव ठाकरे यांचं कुौतुक केलं, सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन कौतुक केलं. परंतु, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून 40 जणांनी गद्दारी केली. गद्दारी करणाऱ्यांमध्ये काही मंत्री होते, आताही त्यातील काही मंत्री झालेत.  मग गद्दीरी करून त्यांनी काय मिळवलं? गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या स्मारकाला अभिवादन केले. पण गेल्या दोन महिन्यांपासून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली होत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी निष्ठावंत मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य उभा केलं. परंतु,  या गद्दारांनी आपली निष्ठा विकली आहे. त्यामुळे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. "

गुलाबराव पाटील यांनी काल जळगावमध्ये आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  स्मारकांचे पूजन करून अभिवादन केले होते. मात्र, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकार नसल्याचं सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही  स्मारकांचे दुग्धाभिशेकाने शुध्दीकरण करून निषेध व्यक्त केला आहे. 

गुलाबराव पाटील यांनी धरणगावात ज्या- ज्या पुतळ्यांना अभिवादन केले होते, त्यांचे शुद्धीकरण शिवसैनिकांकडून करण्यात आले. बंडखोरी केल्यामुळे गुलाबराव पाटील यांच्याविरोधात धरणगातील  शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget