(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : पोलीस कर्मचाऱ्याचा तमाशात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस अधीक्षकांकडून निलंबनाची कारवाई
Jalgaon News : तमाशात चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जळगावातील हा प्रकार आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
Jalgaon News : तमाशात चक्क पोलीस (Police) कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा कर्मचारी केवळ नाचत नाही तर पैसे ओवाळून टाकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. जळगावातील (Jalgaon) हा प्रकार असून यामुळे पोलीस दलाची नाचक्की होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावातील हा प्रकार आहे. महिनाभरापूर्वी इथे तमाशाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक असलेला हा कर्मचारी चक्क नाचताना तसंच पैसे ओवाळून टाकताना दिसून आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केल. पोलीस उपनिरीक्षक भटू विरभान नेरकर असं तमाशाच्या कार्यक्रमात नाच करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
गेल्या महिन्यात निवृत्तीनगरात भावेश पाटील या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी खेडी खुर्द इथल्या भूषण रघुनाथ सपकाळे आणि आव्हाणे इथल्या मनीष नरेंद्र पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील संशयित भूषण सपकाळे याच्या गावातील तमाशात पोलीस उपनिरीक्षक भटू नेरकर हा आपल्या एका सहकार्यासह नाचला होता. पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याच व्हिडीओत भूषण सपकाळे हा देखील नाचत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची क्लिप व्हायरल
यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाची मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी क्लिप व्हायरल झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख किरणकुमार बकाले हे मराठा समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत आले असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. बकाले यांच्यामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलीन झालेली असताना त्यांच्या पाठोपाठ आता पोलीस उपनिरीक्षक भटू विरभान नेरकर याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं आहे. त्यामुळे तमाशाच्या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी नाचल्याने जळगाव जिल्हा पोलीस दलाची नाचक्की होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Viral Video : वाहतूक नियंत्रित करताना एका पोलिसाची खास शैली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल