jalgaon News: ऐन दिवाळी सणात वृध्द दांपत्यास उघड्यावर राहण्याची वेळ; घरमालकाने कारण न सांगताच बाहेर काढलं, पावसात, चिखलत काढला दिवस अन्...
jalgaon News: पहाटे घरातील सामानासह घरखाली करण्यासाठी धमकावल्याने, घाबरलेल्या या दांपत्याने आपले राहते घर सामनासह सोडून देत, शहरातील वाघनगर परिसरात एका झाडाच्या खाली त्यांनी निवारा शोधण्याच्या प्रयत्न केला.

जळगाव: ऐन दिवाळीच्या दिवसातच घर मालकाने कोणतेही कारण न सांगता, घरातील सामानासह घराच्याबाहेर काढून दिल्याने उत्तम राठोड आणि लताबाई राठोड या पंचाहत्तर वर्षीय वृध्द दांपत्यास उघड्यावर (jalgaon News) राहण्याची वेळ आली आहे. जळगाव शहरातील मोहाडी रोड भागात राहणारे उत्तम आणि लता राठोड हे वयोवृद्ध दांपत्य मोलमजुरी करून आपला उदर निर्वाह करते, मोहाडी रोड परिसरात एका लताबाई नामक महिलेच्या घरात ते भाड्याने राहत होते, मात्र या दांपत्यास घरमालक शांंताबाई हिच्या मुलाने काल (बुधवारी) पहाटे घरातील सामानासह (jalgaon News) घरखाली करण्यासाठी धमकावल्याने, घाबरलेल्या या दांपत्याने आपले राहते घर सामनासह सोडून देत, शहरातील वाघनगर परिसरात एका झाडाच्या खाली त्यांनी निवारा शोधण्याच्या प्रयत्न केला.(jalgaon News)
jalgaon News: घरातील सामानसह भिजण्याची वेळ
मात्र काल (बुधवारी) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने या राठोड परिवाराचे घरातील सामानसह भिजण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं. रात्री अंधार पडला तरी अंधारात आणि चिखलात बसलेले हे दांपत्य पाहून, परिसरातील काही जणांनी या दाम्पत्याला जेवण दिले, तर काहींनी आपल्या परिसरात तात्पुरता निवारा उपलब्ध करून देत, मानवतेचा दर्शन घडविले आहे. या दाम्पत्याला विवाहित मुलगा आणि दोन मुली असल्याचं राठोड सांगतात, मात्र या मुलांना ही त्यांच्यावर ओढलेला प्रसंग सांगितला असता, मुलगा आणि मुलगी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती राठोड दांपत्याने दिली आहे.
jalgaon News: घराचं भाडं दिलेलं असतानाही
पुढील काळात नव्याने भाड्याचे घर शोधून आपण त्यात राहायला जाणार असल्याचा मानस या दांपत्याने व्यक्त केला आहे. झाल्या घटनेत एकीकडे घर मालकाने एवढ्या वयस्कर दांपत्यास घराच्या बाहेर काढून देत, संवेदनशीलता हरवल्याचा प्रत्यय दिला असताना, दुसरीकडे मात्र परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीसाठी धाऊन आल्याने, माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं पाहायला मिळाले आहे. घराचं भाडं दिलेलं असतानाही घरमालकांनी आम्हाला घराबाहेर काढलं, आम्ही दिवाळी होईपर्यंत थांंबतो असं म्हटलं होतं पण त्यांनी ऐकलं नाही, लगेचच आम्हाला रूम खाली करायला सांगितली, आम्ही आता दुसरं घर शोधतो आहे, तीन मुलं या दांपत्याला आहेत, दोन मुली आणि एक मुलगा आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
























