एक्स्प्लोर

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अडचणीत वाढ? जळगाव न्यायालयात फौजदारी खटला, आज सुनावणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव न्यायालयात (Jalgaon Court) फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज 3 ऑक्टोबर रोजी जळगाव न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. 

दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात ॲड. अजयकुमार सिसोदिया (Ajaykumar Sisodia) व ॲड. दीपक सोनवणे (Deepak Sonwane) यांच्या मार्फत फिर्यादी फारूक शेख अब्दुल्ला एकता संघटन समन्वयक यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. भारतीय नागरिक न्याय संहिता कलम 175 प्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल

आमदार नितेश राणे यांनी 1 सप्टेंबर रोजी जे वक्तव्य केले होते ते मला व जळगावकरांना उद्देशून केलेले आहे. कारण 27 ऑगस्ट रोजी आमच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांनी आम्हा जळगावकर मुस्लीम समाजास उद्देशून बोलले. त्यामुळे फारुक शेख यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर काही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस महासंचालक महाराष्ट्र, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र त्यावर देखील काही कारवाई न झाल्याने भारतीय नागरिक न्याय संहिता कलम 175 प्रमाणे जळगाव येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात हा फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे.

एकता संघटनेने केला खटला दाखल

जळगाव जिल्हा एकता संघटनेची स्थापना झाली असून त्यात सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व सामाजिक संघटनेतील लोकांचा समावेश असून त्यानुसार एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी संघटनेचे संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, अनिस शहा , अन्वर खान, अहमद सर, इरफान अली सय्यद, युसुफ खान, फिरोज शेख व अमजद पठाण आदींची उपस्थिती होती. जळगाव न्यायालयात तक्रार दाखल केल्यावर ॲड अजयकुमार सिसोदिया, ॲड दीपक सोनवणे यांच्यासह फारुक शेख  यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

आणखी वाचा 

Shiv Sena Dasara Melava: ठाकरे गटाचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार?; दसरा मेळाव्याच्या 4 दिवसआधीच विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange PC Sambhajinagar : Devendra Fadnavis मराठ्याच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा : जरांगेABP Majha Headlines : 12 PM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
मोठी बातमी! उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराजांना ठोकल्या बेड्या; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, नेमकं काय कारण?
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Pune Crime: बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
Sangli News : सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
Manoj Jarange : ...तर फडणवीसांच्या कारकि‍र्दीतील मोठी चूक असेल, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा, नेमकं काय म्हणाले?
...तर फडणवीसांच्या कारकि‍र्दीतील मोठी चूक असेल, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा, नेमकं काय म्हणाले?
Sambhaji Bhide : महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले, हिंदू समाजाला xxडू बनवत आहेत : संभाजी भिडे
महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले, हिंदू समाजाला xxडू बनवत आहेत : संभाजी भिडे
Embed widget