जळगाव दूध संघ निवडणूक, सतीश पाटील आणि चिमण पाटील आमने-सामने
Jalgaon Milk Sangh Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील व शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते.
Jalgaon Milk Sangh Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील व शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. मात्र आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही या दोघांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. पारोळा मतदार संघातून डॉक्टर सतीश पाटील यांच्या विरुद्ध आमदार सतिश पाटील यांच्यात सरळ लढत रंगणार आहे. डॉ. सतीश पाटलांनी तर थेट भारत पाकिस्तान प्रमाणे ही लढत होईल, असं बोलून दाखवल्याने दोघांमधील ही लढत चांगलीच चुरशीची होणार आहे.
पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेची निवडणूक म्हटली की डॉक्टर सतीश पाटील व चिमणराव पाटील या दोघांची नावे समोर येतात आणि त्याला कारणही तसेच आहे. पक्ष म्हणून नाही तर हे दोघे सुरुवातीपासूनच एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये रंगणार आघाडा आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही रंगणार आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात आव्हान उभे करत निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. डॉ. सतीश पाटील हे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर आमदार चिमणराव पाटील हे भाजप शिंदे गटाचे उमेदवार आहेत. पक्षांचा विचार केला तर राज्यात दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.
तर दुसरीकडे डॉ. सतीश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष त्या मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आहे तसेच ते जिल्हा दूध संघाचे संचालक राहिलेले आहेत. तर चिमणराव पाटील हे सुद्धा जिल्हा दूध संघावर चेअरमन राहिलेले असून त्यांची जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची ही चौथी टर्म आहे. तसेच ते आता सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळेच जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत डॉ. सतीश पाटील व आमदार चिमणराव पाटील या दोघांमध्ये काटेकी टक्कर पहायला मिळणार आहे.
या लढती बाबत बोलताना आमदार सतीश पाटील यांनी थेट भारत पाकिस्तानच्या लढतीचा उल्लेख केला. आमदार डॉ. सतीश पाटील यांनी माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे यांच्यासाठी डॉ. सतीश पाटील यांनी ओबीसी मतदार संघातून माघार घेतली आहे. मात्र तालुका मतदार संघातून डॉ.सतीश पाटील यांची उमेदवारी कायम असून चिमणराव पाटील यांच्यासोबत इंडिया पाकिस्तान प्रमाणे आपली फाईट राहील असे डॉ. सतीश पाटील म्हणाले.
चिमणराव पाटील यांनीही या निवडणुकीबाबत बोलताना पारंपारिक लढत असल्याचे सांगितले. तसेच इंडिया पाकिस्तान प्रमाणे ही लढत असली तरी आपण इंडिया असून कोण जिंकेल हे मतदार ठरवेल असे चिमणराव पाटील म्हणाले. तसेच राजकारणात कुणालाही कमी समजू नये. विरोधकाला कधी कमकुवत समजू नये, आतापर्यंतचा जिल्हा दूध संघातील कामगिरी त्यामुळे मतदार आपल्या बाजूने राहतील असा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.