Eknath Khadse : शिंदे सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना दुहेरी धक्का
Jalgaon News : जिल्हा दूध संघाच्या कारभारासाठी चौकशीसाठी समिती नियुक्त, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त
Eknath Khadse : शिंदे गट व भाजप युतीतील सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला आहे. खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता व गेल्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबवण्यात आलेली कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व झाल्याची तक्रार शासनाकडे गेली होती. मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती, असेही तक्रारदार नागराज पाटील यांनी सांगितले.
मात्र शिंदे गट व भाजप युती सरकारची स्थापना झाली, त्यानंतर या सरकारने तक्रारीची दखल घेत याप्रकरणी पाच जणांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाताई खडसे अध्यक्ष असलेले संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचेही तक्रारदार नगराज पाटील यांनी यावेळी सांगितले. विशेष लेखापरीक्षक अध्यक्ष असलेल्या या चौकशी समितीत पाच जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश आज गुरुवारी शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव नी.भा.मराळे यांनी पारित केले आहेत. असेही तक्रारदार नगराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या ताब्यात एकमेव जिल्हा दूध संघ होता. मात्र शिंदे व भाजप युतीतील सरकारने या ठिकाणच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती केली तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत तातडीने प्रशासक नियुक्त केले आहे. हा नएकनाथ खडसे यांना हा खूप मोठा धक्का मानला जात असून आधीच अनेक चौकशांच्या फेऱ्यात सापडलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणींमध्ये मोठी भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी ही मोठी राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. यात दूध संघाच्या कारभारात एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही जर झाला असेल तर दोषींवर कारवाई करावी याची मागणी मी स्वतःच करणार असल्याचेही खर्च यावेळी म्हणाले. संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी तातडीने प्रशासक नियुक्त करणे तसेच चौकशी समिती नियुक्त करणे यात मोठे राजकारण आहे, असे खडसे म्हणाले.