Jalgaon Flights News: जळगावकरांसाठी आनंदाची बातमी! आता दीड तासात मुंबई गाठता येणार, दररोज विमानसेवा सुरु
Jalgaon Flights News: जळगाव ते मुंबई विमान सेवा दररोज सुरू झाली आहे. यामुळे जळगावकर आता दीड तासात मुंबई गाठणार आहेत.

Jalgaon Flights News: जळगावकरांसाठी (Jalgaon) मोठी आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून (Jalgaon Airport) आता जळगाव ते मुंबई दरम्यानची (Jalgaon to Mumbai) विमान सेवा दररोज सुरू होत आहे. आतापर्यंत ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस उपलब्ध होती, मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अलायन्स एअर या विमान कंपनीने दररोजची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या व्यवस्थेनुसार प्रवासी आता अवघ्या दीड तासात जळगावहून थेट मुंबई गाठू शकतील. ही सेवा सुरु झाल्याने व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोठी सोय झाली आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून, रेल्वे व रस्तेमार्गावरील ताणही कमी होणार आहे. याचबरोबर, जळगाव मार्गे अहमदाबाद विमान सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील व्यावसायिक व व्यावसायिक प्रवास करणाऱ्यांना सुलभता मिळणार आहे.
Jalgaon Flights News: 70 टक्के प्रवाशांनी केले ॲडव्हान्स बुकिंग
अलायन्स एअरकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेवांना जळगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जळगाव–मुंबई विमानसेवेसाठी तब्बल 70 टक्के प्रवाशांनी ॲडव्हान्स बुकिंग केले असून, सुरुवातीपासूनच तिकीट आरक्षणाचा आकडा समाधानकारक आहे. जळगाव विमानतळ सध्या केंद्र सरकारच्या “उडान” योजनेच्या (UDAN Scheme) अंतर्गत कार्यरत असून, या योजनेखाली गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद अशा पाच प्रमुख शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे. जळगाव–मुंबई दररोजच्या उड्डाणामुळे जिल्ह्याच्या संपर्कात मोठी वाढ होणार असून, पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व व्यावसायिक वर्गाने व्यक्त केला आहे.
Jalgaon Flights News: जळगाव विमानसेवेचे नवे हिवाळी वेळापत्रक जाहीर
दरम्यान, जळगाव विमानतळावरून सुरू असलेल्या विविध विमानसेवांसाठीचे नवे हिवाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या मार्गांसाठी वेळांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
गोवा–जळगाव (Goa–Jalgaon)
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता) दुपारी 12:10 वाजता गोव्यातून विमान निघून 1:50 वाजता जळगावात पोहोचेल. शनिवारी हे विमान दुपारी 2:30 वाजता गोव्यातून निघून 4:20 वाजता जळगावात पोहोचेल.
जळगाव–गोवा (Jalgaon–Goa)
सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी विमान सायंकाळी 5:35 वाजता जळगावहून निघून 7:20 वाजता गोव्यात पोहोचेल. बुधवारी हे उड्डाण 6:05 वाजता जळगावहून सुटून 8:05 वाजता गोव्यात पोहोचेल. शनिवारी रात्री 8:25 वाजता जळगावहून उड्डाण भरून 10:25 वाजता गोव्यात पोहोचेल.
जळगाव–पुणे (Jalgaon–Pune)
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता) दुपारी 2:10 ला जळगावहून विमान निघून 3:30 ला पुण्यात पोहोचेल. शनिवारी हे विमान सायंकाळी 4:40 ला निघून 6:00 वाजता पुण्यात पोहोचेल.
पुणे–जळगाव (Pune–Jalgaon)
सोमवार ते रविवार (शनिवार वगळता) दुपारी 3:50 ला पुण्याहून विमान निघून 5:15 ला जळगावात पोहोचेल. शनिवारी हे उड्डाण सायंकाळी 7:00 ला पुण्याहून निघून 8:05 ला जळगावात पोहोचेल.
जळगाव–हैदराबाद (Jalgaon–Hyderabad)
ही सेवा दररोज उपलब्ध असून विमान सायंकाळी 6:25 वाजता जळगावहून निघून 8:45 वाजता हैदराबादला पोहोचेल. तर हैदराबाद–जळगाव सेवा सायंकाळी 4:25 ला हैदराबादहून सुटून 6:05 ला जळगावात पोहोचेल.
मुंबई–जळगाव–मुंबई (Mumbai–Jalgaon–Mumbai)
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी विमान रात्री 8:00 ला मुंबईहून येऊन 8:35 PM ला पुन्हा मुंबईकडे परतेल. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी विमान दुपारी 4:20 ला मुंबईहून जळगावला येईल. त्यानंतर 4:45 ला जळगावहून अहमदाबादला रवाना होईल. परतीचे विमान रात्री 8:00 PM ला जळगावात येऊन 8:25 PM ला पुन्हा मुंबईकडे उड्डाण भरेल.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
























