Jalgaon : दूध संघ निवडणुकीत खोक्यांचा वापर केला जाईल, एकनाथ खडसेंचा आरोप; गुलाबराव पाटील म्हणाले, माझी हात जोडून विनंती...
Jalgaon News: जळगाव जिल्हा दूध संघाची (Jalgaon Dudh Sangh) निवडणूक शनिवारी 10 डिसेंबर रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे.
Jalgaon News: जळगाव जिल्हा दूध संघात (Jalgaon Dudh Sangh) निवडणुकीत सत्तेचा वापर करत विरोधकांकडून खोक्याचा वापर होईल, धनाचा वापर होईल, विरोधकांवर आता आम्हाला बोलायचं नाही किंवा त्यांना उत्तर पण द्यायच नाही. ते मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी दिसेलच असं म्हणत एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) विरोधकांवर टीका केली आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना लोक खोक्यांच्या विषयाला कंटाळले आहेत, पण यांचे ते तीन लोक जेलमध्ये आहेत, ते काय पारितोषिक विजेते आहेत का? असा सवाल उपस्थित करत खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.
जिल्हा दूध संघातील नोकर भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप माझ्याकडे असल्याचं सांगत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला होता. यावरून एकनाथ खडसे यांनी ऑडिओ क्लिप किंवा काही पुरावे आहेत तर निवडणुकीत लोकांच्या समोर मांडायला हवे होते, असं त्यांनी म्हटलं. माझ्या विरोधातील व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्याचा निवडणुकीत वापर करणार कर ना... असा एकेरी उल्लेख करत एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना उत्तर दिले आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत मतदार हे सुज्ञ असून विकासाच्या बाजूने आहेत. विकास काम ज्यांनी केले..त्यांच्यावर मतदार शिक्कामोर्तब करणार असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील...
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मतदार हे विकासाच्या बाजूच्या बाजूने असल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं होतं. त्यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघ प्रकरणी दाखल करण्यात तीन जण जेलमध्ये आहेत हाच का त्यांचा विकास असं म्हणत एकनाथ खडसेंना उपरोधक टोला लगावला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खोक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप ही एकनाथ खडसेंनी केला होता. खोक्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे. खोक्यांच्या विषयाला लोक कंटाळले आहेत, पण यांचे ते तीन लोक जेलमध्ये आहेत ते काय पारितोषिक विजेते आहेत का? असा सवाल उपस्थित करत खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. जिथे चुकत असेल तिथे मार्गदर्शन करावे, त्यांच्यासारख्या नेत्याने एवढं खालच्या पातळीवर वरील राजकारण करू नये, ही माझी हात जोडून विनंती आहे, असेही पाटील म्हणाले. उद्या जे काय होईल यात कोणाचा विजय हे जनतेसमोरच येईल असे आव्हान ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे.
दूध संघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यासह गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे.
ही बातमी देखील वाचा