एक्स्प्लोर

Gulabrao Patil : 'अजितदादांची जनसन्मान यात्रा गुलाबी म्हटली जाते, योगायोगाने माझही...'; गुलाबराव पाटलांची मिश्कील प्रतिक्रिया

Gulabrao Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात झाली आहे. या यात्रेत गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे.

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेला (Jansanwad Yatra) आज नाशिकच्या दिंडोरीपासून (Dindori) सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा असणार आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. 

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला गुलाबी यात्रा म्हटली जाते. मात्र, कुणाचा रंग हा लकी असतो. अजित पवारांची यात्रा गुलाबी म्हटली जाते तर योगायोगाने माझेही नाव गुलाब आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.   

अजित पवारांचा आम्ही आदरच करतो : गुलाबराव पाटील

दरम्यान, अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रि‍पदाची संधी मिळाली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सोबत आणलं असतं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पूर्वीच माझी राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. पण मी मागे राहिलो, असे वक्तव्य केले होते. याबाबतही मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, अजित पवार हे सीनियर आहेच.  आम्ही त्यांचा आदर करतो.  अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. सकाळी सकाळी सुद्धा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.  त्यामुळे अजित पवारांचा आम्ही आदरच करतो, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.  

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतील वाहनांना गुलाबी रंग

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान केले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

अजितदादांचं काम 365 दिवस चालू असतं, दररोज काम करणाऱ्या माणसाला निवडणुकीचा कालावधी महत्वाचा नसतो : रुपाली चाकणकर

Narhari Zirwal : 'पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं'; नरहरी झिरवाळांची अजितदादांसमोर तुफान फटकेबाजी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धसJitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget