एक्स्प्लोर

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपची वाट खडतर? गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट, उन्मेष पाटलांचाही घेतला खरपूस समाचार!

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असतानाच गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच उन्मेष पाटलांचा देखील गिरीश महाजनांनी खरपूस समाचार घेतला आहे.

Girish Mahajan : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपत प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. एकीकडे एकनाथ खडसे हे भाजपच्या (BJP) वाटेवर असताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांच्यासह भाजप सोडून गेलेल्या उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंना आपल्या घरात पद पाहिजे असल्याने 2019 मध्ये हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापले गेल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे. 

गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

मी म्हणजे भाजप म्हणणारे त्यांचे काय झाले. आज त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका त्यांनी एकनाथ खडसेंवर केली आहे.  दिवंगत हरिभाऊ जावळे (Haribhau Jawale) यांचे देखील तिकीट खडसेंच्या आग्रहामुळे कापले गेले. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत देखील त्यांचा घात झाल्याचा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. 

आता बघा कसा उबाठाचा फफुटा उडतो - गिरीश महाजन 

उन्मेष पाटील यांना भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. नुकताच त्यांनी भाजपला रामराम ठोकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, तुम्ही शिवसेना ठाकरे गटात गेले आता बघा कसा उबाठाचा फफुटा उडतो, अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे. 

गिरीश महाजनांचे उन्मेष पाटलांना आव्हान

मोठे मोठे नेते थप्पीला लागले आहेत. तुमचं तर काहीच नाही. जर तुमची इकडे ताकद होती, काम केले आहे तर स्वतः लोकसभा लढवायची होती, यांच्या त्याच्या खांद्यावर का बंदूक ठेवली, असे आव्हान गिरीश महाजन यांनी  उन्मेष पाटलांना दिले आहे. मागच्या वेळी स्मिता वाघ यांचे ऐनवेळी तिकीट कापले पण त्यांनी पक्ष सोडला नाही. यावेळी तुम्हाला तिकीट दिले नाही तर लगेच पक्ष सोडला. वेगळ्या पक्षात गेले. 

अमोल जावळे भाजप सोडून जाणार नाही 

आता चालले आहे त्यांचे माझा मित्र, निवडून येण्यासारखी परिस्थिती असती तर उन्मेष पाटलाने तिकीट घेतले असते. मात्र परिस्थिती विरुद्ध आहे. म्हणून करण पवारांची निवड करण्यात आली आहे. अमोल जावळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अमोल जावळे यांनी मला मी भाजप सोडून जाणार नाही. माझी पक्षावर निष्ठा आहे, असे सांगितल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Eknath Khadse Joins BJP : एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशाची इनसाईड स्टोरी, गेल्या तीन महिन्यांत काय-काय घडलं? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ayodhya Flag Ceremony : रामनगरी अयोध्येत धर्मध्वजारोहण सोहळ्याचा उत्साह
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Smriti Mandhana Marriage Postpond : वडिलांची प्रकृती बिघडली, स्मृती मानधनाचा विवाहसोहळा पुढे ढकलला
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Satara Politics : सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
सातारा जिल्ह्यात सातारा कराडसह नऊ नगरपरिषदा आणि मेढा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी कोण रिंगणात? यादी पाहा
Silver Rate : चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात आठवड्यात 8000 रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Photos: डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा जोधपुरी सूटमध्ये शाही लग्नात पोहोचला; नवरदेवाचा हत्तीवर नाच, नोरा, जान्हवी, जॅकलीन अन् माधुरी दीक्षितने डान्सने चार चाँद!
Team India :दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला लॉटरी, रिषभ पंत, रवींद्र जडेजाचं कमबॅक, अक्षर पटेलला वगळलं, निवड समितीकडून मोठे बदल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, ऋतुराजला लॉटरी, रिषभचं कमबॅक, कोणाला वगळलं?
India vs South Africa, 2nd Test: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Video: गुवाहाटी कसोटीत DRS वरुन फुल्ल ड्रामा; तिसऱ्या पंचांनी निर्णय उलटवला, जडेजा स्तब्ध राहिला
Share Market : रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल, पाच दिवसात 36000 कोटी रुपयांची कमाई, सेन्सेक्सवरील 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं
Embed widget